तुळजापूर : विहिरीतील मोटर काढताना शॉक बसला, दोन कुटुंबातील पिता-पुत्रांचा जागीच मृत्यू; सर्वत्र हळहळ

मुंबई तक

Dharashiv News : या दुर्घटनेत शेतकरी नागनाथ काशीनाथ साखरे (वय 56) आणि त्यांचा मुलगा रामलिंग नागनाथ साखरे (वय 30) यांचा मृत्यू झाला. तसेच मजुरीसाठी आलेले काशिम कोंडाजी फुलारी (वय 47) आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा रतन काशिम फुलारी (वय 16) यांचाही या अपघातात जीव गेला. एकाच ठिकाणी दोन बाप-लेकांचा मृत्यू झाल्याने केशेगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

Dharashiv News
Dharashiv News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुळजापूर : विहिरीतील मोटर काढताना शॉक बसला

point

दोन कुटुंबातील पिता-पुत्रांचा जागीच मृत्यू; सर्वत्र हळहळ

Dharashiv News : तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. शेतातील बोअरची बिघडलेली मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना क्रेनचा कप्पा थेट उच्चदाब विद्युत वाहिनीवर कोसळला. या दुर्घटनेत काम करत असलेल्या चौघांना जोरदार विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेत दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील बाप-लेकांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

या दुर्घटनेत शेतकरी नागनाथ काशीनाथ साखरे (वय 56) आणि त्यांचा मुलगा रामलिंग नागनाथ साखरे (वय 30) यांचा मृत्यू झाला. तसेच मजुरीसाठी आलेले काशिम कोंडाजी फुलारी (वय 47) आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा रतन काशिम फुलारी (वय 16) यांचाही या अपघातात जीव गेला. एकाच ठिकाणी दोन बाप-लेकांचा मृत्यू झाल्याने केशेगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागनाथ साखरे यांच्या शेतातून दोन्ही बाजूंनी उच्चदाब विद्युत वाहिनी गेलेली आहे. याच शेतातील बोअरची मोटार बिघडल्याने ती बाहेर काढण्यासाठी शनिवारी दुपारी क्रेनच्या साहाय्याने काम सुरू होते. चौघेही क्रेनच्या कप्प्यावर उभे राहून मोटार काढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कप्पा खाली पडून अधिक नुकसान होऊ नये, यासाठी चौघांनी तो सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणातच कप्पा जवळच असलेल्या उच्चदाब वाहिनीवर आदळला. त्यातून मोठा विद्युत प्रवाह उतरल्याने चौघांनाही तीव्र शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : दोन्ही मुली सहा वर्षांपासून एकाच घरात... कधीच बाहेर पडल्या नाहीत अन् अचानक मृत्यू! 'त्या' घरात नेमकं काय सुरू होतं?

हे वाचलं का?

    follow whatsapp