तरुण मुलीच्या प्रेमात वेडा झाला होता, तिचं स्वप्न पाहिलं पण... अखेर नको तेच अक्रित घडलं

मुंबई तक

Crime news : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. नजीबाबाद येथील एका महामार्गावर पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं? 

point

20 लाख रुपये मोजावे लागतील

point

मफलरने गळा दाबून हत्या 

Crime news : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. नजीबाबाद येथील एका महामार्गावर पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृताची समीर अशी ओळख निर्माण झाली होती. समीरच्या वडीलांचे नाव दिलशाद होते, त्यांनी आपल्या मुलाचा खून झाल्याचं सांगितलं. यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते, नंतर पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्यांनी एक असं सांगितलं तेव्हा ते सर्वच थक्क झाले होते.

हे ही वाचा : लातूर हादरलं! PSI च्या त्रासाला कंटाळून तरुणानं झाडाला दोर बांधून संपवलं जीवन, धडकी भरवणारी घटना

नेमकं काय घडलं? 

या प्रकरणात तपासातून समोर आले की, समीरला त्याच्याच चुलत भावाचे वेड लागले होते. तो कोणत्याही परिस्थिती तिच्याशी संबंध ठेवू इच्छित होता. तो तिच्याशी जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करू इच्छित होता. अशातच त्याचा खून करण्यात आला आणि नंतर समीरला सापळ्यात अडकून मारण्यात आले होते. 

या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले की, समीर त्याच्या चुलत भावासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करू इच्छित होते. त्याचे काका त्याला अनेकदा विरोध दर्शवत होते. त्याने नंतर वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने या बाबतीत नकार दिला होता. अशातच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाची माहिती अस्वस्थ झालेल्या काकांनी दिल्लीतील त्याचा मित्र झैनुलला सांगितली होती. नंतर झैनुलने समीरकडून लाखो रुपये उकळण्यासाठी फसवणूक केली, तोवर हत्येची कोणतीही चर्चा झालेली नव्हती. अंतिमक्षणी समीरच्या हत्या झाली.  

20 लाख रुपये मोजावे लागतील

एका वृत्तानुसार, झैनुलनं समीरच्या काकांना सांगितलं की, मी मुलीचा पाठलाग करणं थांबवले, पण त्यासाठी त्याला सुमारे 20 लाख रुपये मोजावे लागतील. याबाबत काकांनी होकार देऊन 5 लाख रुपये देखील दिले होते. झैनुलने पहिल्यांदा एका मुलीच्या नावाने बनावट सोशल माीडियावर अकाउंट बनवलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp