लातूर हादरलं! PSI च्या त्रासाला कंटाळून तरुणानं झाडाला दोर बांधून संपवलं जीवन, धडकी भरवणारी घटना

मुंबई तक

Latur Crime : लातूर जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तहसील क्षेत्रात 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता घडली.

ADVERTISEMENT

Latur Crime
Latur Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लातूर जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना

point

कुटुंबियांसह नागरिकांकडून निषेध व्यक्त

Latur Crime : लातूर जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तहसील क्षेत्रात 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता घडली. या प्रकरणात जीवन संपवलेल्या तरुणाचे नाव इमरान बेलूरे (वय 20) असे होते. तर पीएसआय अधिकाऱ्याचे नाव विठ्ठव दूरपडे असे आहे. तसेच वाहन चालक तानाजी तेले अशी आरोपींची नावे आहेत.

हे ही वाचा : मुंबईकरांना युती, आघाडीत नाही इंटरेस्ट... 'ही' एकच गोष्ट पलटवणार सगळा गेम, उमेदवारांची झोप उडवणारा 'तो' सर्व्हे!

व्हिडिओ रेकॉर्ड करून मनातली सल केली व्यक्त

या प्रकरणात मृत इमरानने आपला व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या व्हिडिओत तो म्हणाला की, 'पोलिसांनी माझ्यावर नको तोच दबाव आणला होता. हे सर्व माझ्या आईसह कुटुंबाला सहन होत नसल्याने मी जीवन संपवत आहे. मला एवढंच सांगायचं की, औराडचे पीएसआय हे रात्री 12 वाजता आमच्या आईला विचारायचे की, तू काय खाल्ल? मुलगा त्रास देतो का? असं विचारलं जात होतं. यात पूर्णपणे पीएसआयचीच चूक आहे. तसेच तानाजी नावाच्या एका ड्रायव्हर हा रात्री राऊंडसाठी यायचा आणि तो माझ्यावर अनेकदा दबाव आणायचा', असं म्हणत त्याने आपल्या मनातील सल व्हिडिओत रेकॉर्ड करून तो व्हिडिओ लहान भाऊ इस्माईलला पाठवला होता, नंतर झाडाला दोर बांधून त्यानं आपलं जीवन संपवलं.

हे ही वाचा : निकालानंतर 5 दिवसात नगरसेवक महिलेच्या पतीचा खून, आता हत्याप्रकरणात सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचं नावं समोर

कुटुंबियांसह नागरिकांकडून निषेध व्यक्त

संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर आत्महत्या केलेल्या इमरानचे कुटुंब आणि लोकांनी पोलीस ठाण्यात जाऊन लोकांनी निषेध नोंदवला होता. इम्रानचे वडील खलील बेलुरे यांनी इम्रानबद्दल बोलताना सांगितले की, 4 वर्षांपूर्वी इम्रानला एका किरकोळ चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि 4 वर्षांपूर्वी या प्रकरणात त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून त्याला पोलिसांसह एका वाहनचालकाचा त्रास सहन करावा लागत होता. अशातच आता नागरिकांनी या प्रकरणाबाबत निषेध व्यक्त केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp