निकालानंतर 5 दिवसात नगरसेवक महिलेच्या पतीचा खून, हत्याप्रकरणात सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचं नावं समोर
Khopoli crime : खोपोलीच्या नगरसेवक मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे (वय 45) यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येत खूनाचा कट रचणाऱ्याचे नाव समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मंगेश काळोखे खून प्रकरणात कोण?
पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय
Khopoli Crime : खोपोलीच्या नगरसेवक मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे (वय 45) यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येत खूनाचा कट रचणाऱ्याचे नाव समोर आले आहे. कटात सामील असणारा दुसरा तिसरा कोणीही नसून राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्यासह इतर आठ जणांची देखील नावे समोर आली आहेत.
हे ही वाचा : पुणे महापालिकेवर 2017 मध्ये भाजपने 'असा' फडकवला होता भगवा, इतिहास घ्या जाणून
कटात कोणाचा समावेश?
राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांचा या प्रकरणात समावेश असल्याचं बोललं जात आहे. तसेच याच प्रकरणात रायगड जिल्हा प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस भरत भगतसह स्थानिक पराभूत झालेले उमेदवारांचा देखील यात समावेश आहे. उर्मिला देवकर यांचे पती रविंद्र परशुराम देवकर आणि धनेश देवकर यांनी कट रचला होता. तसेच दर्शन रविंद्र देवकर, सचिन संदिप चव्हाण यांचा देखील या प्रकरणात समावेश होता.
हे ही वाचा : मुंबई: बिर्याणीमुळे संसारात मिठाचा खडा, नवऱ्याने बायकोला भिंतीवर आपटत संपवलं
पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय
मंगेश काळोखे यांच्या मृत्यूबाबतची महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय अधिक बळावला गेला होता. मंगेशवर कोयता, कुऱ्हाडीने हल्ला करत जीवे मारण्यात आले होते. या प्रकरणी मंगेश कोळखे यांच्या पुतण्याने याबाबतची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी 7 आणि इतर 3 आरोपींवर खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.










