पुणे महापालिकेवर 2017 मध्ये भाजपने 'असा' फडकवला होता भगवा, 2025 मध्ये काय होणार? इतिहास घ्या जाणून
Pune Muncipal Corpotation History : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे महापालिकेचा इतिहासाची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे महापालिकेची रचना आणि नगरसेवकांबाबतची माहिती
पुणे महापालिका निवडणूक 2017 माहिती
Pune Muncipal Corpotation History : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे महापालिकेचा इतिहासाची माहिती नमूद करण्यात येत आहे. पुणे शहरात तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. याचपार्श्वभूमीवर आता पुणे महापालिका आणि निवडणुकीच्या इतिहासाबाबत महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : मुंबईतील मतदार कोणती शिवसेना खरी मानतात? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे; पाहा एका क्लिकवर
पुणे महापालिकेची स्थापना ही 15 फेब्रुवारी 1950 साली झाली होती. 1950 नंतर शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढू लागली होती, यामुळे पालिकेचे रुपांतर महापालिकेत करण्यात आले होते. तसेच याच शहरात शिक्षण, लष्करी छावणी आणि सांस्कृतिक परंपरासाठी शहर ओळखू जावू लागले. तसेच नंतर ते औद्योगिक विकास आणि आयटी हबचे केंद्र बनले.
पुणे महापालिकेची रचना आणि नगरसेवकांबाबतची माहिती
पुणे महापालिकेच्या सामान्य सभेत एकूण 162 नगरसेवक आहेत. तसेच हे नगरसेवक जनतेतूनच निवडून येतात ही माहिती सर्वांनाच माहिती असेलच. अशातच या पालिकेची अंतिम निवडणूक ही 2017 मध्ये पार पडली होती. याबाबतची माहिती ही पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
पुणे महापालिका निवडणूक 2017 माहिती
पुणे महापालिका निवडणूक 2017 ची निवडणूक हा भाजपसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता. पुणे महापालिका निवडणुकीवर अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होतं. पण याच पुण्यात भाजपने चांगली मतं मिळवली होती, त्याची माहिती पुढीलप्रमाणे...










