चुलत बहिणीशीच पळून जाऊन केलं लग्न! शेवटी, झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह...
22 वर्षीय तरुण खुशीराम आणि 20 वर्षीय मोहिनी यांनी घरातून पळून जाऊन एकमेकांसोबत लग्न केलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे, दोघे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ-बहीण लागत होते. मात्र, याच प्रेमी युगुलासोबत एक भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चुलत बहिणीशीच पळून जाऊन केलं लग्न!
शेवटी, झाडावर लटकलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह...
Crime News: उत्तर प्रदेशातील सीतापूर येथून प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील लहरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बस्तीपुरवा गावात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुण खुशीराम आणि 20 वर्षीय मोहिनी यांनी घरातून पळून जाऊन एकमेकांसोबत लग्न केलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे, दोघे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ-बहीण लागत होते. कुटुंबियांचा त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे त्यांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केलं. मात्र, याच प्रेमी युगुलासोबत एक भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह..
लग्न झाल्याच्या 22 दिवसांनंतर, खुशीराम आणि मोहिनी यांचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. झाडावर फासाला लटकलेल्या अवस्थेत दोघांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता, वाहतूक कोंडीची चिंता मिटणार! मुंबईतील 'या' खाडीवर बांधला जाणार पूल...
घरातून पळून जाऊन केलं लग्न
खरं तर, दोघांचे मागील 3 वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. दोघे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ-बहीण लागत असून देखील त्यांनी कुटुंबीय आणि समाजाची पर्वा न करता घरातून पळून जाऊन गावातीलच एका मंदिरात एकमेकांसोबत लग्न केलं. त्यानंतर, दोन्ही कुटुंबियांना हे लग्न मान्य करावं लागलं. पण, आता दोघांचे मृतदेह झाडावर फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. सध्या, पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
हे ही वाचा: नाशिक : भंगार गोळा करणाऱ्या 52 वर्षीय महिलेचा जवळीक ठेवण्यास नकार, 35 वर्षीय नराधमाने डोक्यात दगड घालून संपवलं
पोलिसांचा तपास
मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवारी) रात्री जेवण झाल्यानंतर दोघे झोपले. मात्र आज सकाळी ते दोघेही त्यांच्या खोलीत नव्हते. त्यानंतर, कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याबद्दल काहीच कळालं नाही. शेवटी, दोघांचे मृतदेह मंदिराजवळील एका झाडावर लटकल्याचे आढळून आलं. आता, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.










