भिवंडी-निजामपूर महानगरपालिका : काँग्रेसने 2017 मध्ये मिळवली होती होती एकहाती सत्ता, आता कोण मारणार बाजी?

मुंबई तक

Bhiwandi Nizampur City Municipal Corporation : भिवंडी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भिवंडीत अटीतटीची आणि चुरशीची राजकीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ADVERTISEMENT

Bhiwandi Nizampur City Municipal Corporation
Bhiwandi Nizampur City Municipal Corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचं राजकारण

point

काँग्रेसने 2017 मध्ये मिळवली होती होती एकहाती सत्ता

point

आता कोण मारणार बाजी?

Bhiwandi Nizampur City Municipal Corporation : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेची स्थापना सन 2002 मध्ये करण्यात आली. भिवंडी आणि निजामपूर या जुळ्या शहरांचे प्रशासन पाहण्याची जबाबदारी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडे आहे. सध्याच्या, म्हणजे 2020 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार या महानगरपालिकेत एकूण 84 प्रभागांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भिवंडी शहरात सध्या 6 लाख 69 हजार 033 मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये सुमारे 3 लाख 80 हजार 623 पुरुष मतदार असून 2 लाख 88 हजार 097 महिला मतदारांचा समावेश आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भिवंडीत अटीतटीची आणि चुरशीची राजकीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भिवंडी शहराचा ऐतिहासिक प्रवास

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचा इतिहास समृद्ध आणि दीर्घकालीन आहे. भिवंडी शहराची मुळे आठव्या शतकापर्यंत जातात. त्या काळात हे शहर राजा भीमदेवाच्या अधिपत्याखाली होते आणि तेव्हा याचे नाव ‘भीमदी’ असे होते. कालांतराने भीमदीचे रूपांतर भिवंडी या नावात झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp