मुंबईत महापालिकेसाठी काँग्रेस-वंचित आघाडीनं युतीची घोषणा केली, कोण किती जागा लढणार? आकडा समोर

मुंबई तक

Vanchit And Congress : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रसनं ठाकरेंसोबत एकत्र येण्यास नकार दिला. त्यानंतर आज रविवार 28 डिसेंबर 2025 रोजी काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीसोबत युतीची घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

Vanchit And Congress
Vanchit And Congress
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रसचा ठाकरेंना नकार

point

अखेर वंचितसोबत युती

point

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

Vanchit And Congress : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रसनं ठाकरेंसोबत एकत्र येण्यास नकार दिला. त्यानंतर आज रविवार 28 डिसेंबर 2025 रोजी काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीसोबत युतीची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत  त्यांनी युतीची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडी ही मुंबई महापालिका निवडणूक लढण्यासाठी 62 जागांवर आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा : सोलापूर हादरले, प्रभाग क्र. 16 ची तयारी अन् तृतीथपंथीय इच्छुक उमेदवाराची निर्घुण हत्या, अंगावर किलोभर सोनं अन् उशीने...

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारिपसोबत आमची आघाडी होती. 1999 सालानंतर राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो. पण आता तब्बल 25 वर्षानंतर आघाडीच्या घोषणेचा आनंदच आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. दोघांमध्ये चांगलं नातं देखील आहे, असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईमध्ये वंचित आणि काँग्रेसच्य आघाडीची घोषणा केली.

दरम्यान, वंचितचे शहरप्रमुख आणि उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितलं की, भाजपला रोखायचं असेल तर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ऑनलाईन बैठकीत युतीला मान्यता देखील दिली आहे. अशातच आता 227 पैकी 62 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांनी पैसा जरा जपूनच वापरा, काही राशीतील लोकांच्या नोकरीत बदल होणार?

वंचित आणि काँग्रेस किती जागा लढवणार?

अशातच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीनंतर आता दोन्ही पक्षांनी नेमक्या कुठे आणि कशा जागा लढवता याईल याची माहिती अद्यापही समोर आली नाही. सध्या दोन्ही पक्षातून जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. आता कोणाला किती जागा मिळतीय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp