सोलापूर हादरले, प्रभाग क्र. 16 ची तयारी अन् तृतीथपंथीय इच्छुक उमेदवाराची निर्घुण हत्या, अंगावर किलोभर सोनं अन् उशीने...
Solapur Crime : तृतीयपंथी आयुबच्या घराचे दार उघडले असता पोलिसांना आयुब हा बेडवर निपचित झोपल्याचे दिसून आले. त्यांच्या तोंडावर उशी होती व त्या उशिनेच कदाचित तृतीयपंथीय आयुब यांचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांकडून होत आहे. आयुबच्या तोंडावर उशीर होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापूर हादरले, प्रभाग 16 ची तयारी अन् तृतीथपंथीय इच्छुक उमेदवाराची निर्घुण हत्या,
अंगावर किलोभर सोनं अन् उशीने गळा दाबल्याचा संशय
Solapur Crime : सोलापुरातील तृतीथपंथीय स्थानिक नेत्याची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरातील लष्कर मुर्गीनाला परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास आयुब सय्यद (वय वर्ष 50) या तृतीयपंथीय नेत्याचा मृतदेह घरात आढळून आला होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झालाय. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सदर बाजार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पथकासह दाखल झाले.
अधिकची माहिती अशी की, प्रभाग क्रमांक 16 चा नगरसेवक पदाचा इच्छुक असलेला उमेदवार आयुब सय्यद यांचा अज्ञातांनी खून केला. ही घटना मशीदीजवळ घडल्याचे सांगितले जात आहे. यांची एका पक्षाकडून उमेदवारीसाठी तयारी चालू होती. त्यांचे बॅनर प्रभागात लावले जात होते, मात्र अचानक झालेल्या या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मध्यरात्री सोलापुरातील लष्कर भागातील मुर्गी नाला परिसरात गंभीर घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : Survey: मुंबईत ठाकरेंना बसणार मोठा फटका, मुस्लिम मतदारांचा 'तो' निर्णय सेना-मनसेचं वाढवणार प्रचंड टेन्शन!
तृतीयपंथी आयुबच्या घराचे दार उघडले असता पोलिसांना आयुब हा बेडवर निपचित झोपल्याचे दिसून आले. त्यांच्या तोंडावर उशी होती व त्या उशिनेच कदाचित तृतीयपंथीय आयुब यांचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांकडून होत आहे. आयुबच्या तोंडावर उशीर होती. अज्ञाताने उशीच्या साह्याने तोंड दाबून तृतीयपंथी आयुबचा खून केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. घराशेजारी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या सीसीटीव्ही कॅमेरात रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आयुबच्या घरातून तिघे अज्ञात इसम बाहेर पडतानाचे दृश्य दिसून आले. इतकेच नव्हे तर हातात बॅग असल्याचे निदर्शनास येत आहे. डोक्यावर टोपी व पायात पांढरे बूट दिसून येतायत. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले असून त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात इसमाचे शोध घेत आहेत अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.










