मुंबईची खबर: आता, वाहतूक कोंडीची चिंता मिटणार! मुंबईतील 'या' खाडीवर बांधला जाणार पूल...
मुंबईच्या अंतर्गत भागांत देखील खाडीवर पूल बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे, शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आता, मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीची चिंता मिटणार!
मुंबईतील 'या' खाडीवर बांधला जाणार पूल...
Mumbai News: मुंबईच्या अंतर्गत भागांत देखील खाडीवर पूल बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मालाड येथील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेकडून या निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत, मालाडमध्ये दोन एलिव्हेटेड रोड आणि खाडीवर एक पूल बांधण्यात येणार आहे. तसेच, या प्रोजेक्टसाठी 2225 कोटी रुपये खर्च होणार असल्याची अपेक्षा आहे. यामुळे मालाडमधील वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नगरपालिकेकडून या प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. खरं तर, मालाडमध्ये मोठ्या आयटी कंपन्या आणि फिल्म स्टूडिओ असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी तासन्तास गाड्याच्या रांगा लागतात आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. मालाड हा पश्चिमी उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने या प्रोजेक्टमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.
प्रोजेक्टचे दोन टप्पे
या वर्षीच्या सुरूवातीला नगरपालिकेने या परिसरात दोन एलिव्हेटेड रोड बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रकल्प दोन टप्प्यात विभागला जाणार असून पहिल्या टप्प्यात रामचंद्र नाला परिसरात एक एलिव्हेटेड रोड बांधला जाणार आहे. यामुळे, एमडीपी रोड ते मालाडमधील मालाड-मार्वे लिंक रोडपर्यंत वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच, दुसऱ्या टप्प्यात 792 मी. लांब फ्लायओव्हर बांधला जाणार आहे. हा रोड मालाडमधील इन्फिनिटी मॉलपासून सुरू होऊन थेट लिंक रोडला कनेक्ट होईल आणि नंतर मालावणीमधील महाकाली मार्गापर्यंत पोहोचेल. लिंक रोड ते मालवणी पर्यंतचा परिसर मालाड खाडीवर कॉजवे म्हणून बांधला जाईल.
हे ही वाचा: Govt Job: नाबार्डच्या 'यंग प्रोफेशनल प्रोग्राम'मध्ये सहभागी व्हा! तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी...
दुसऱ्या एकूण 792 मीटर लांबीपैकी 396 मीटर लांबीचा पूल कॉजवे असेल. हा कॉजवे पूल 36.6 मी असून तो 8 लेनचा असेल. या प्रोजेक्टसाठी 2225.95 कोटी रुपये अंदाजे खर्च होणार असून काम सुरू झाल्याच्या तीन वर्षांनंतर, तो पूर्ण होणार असल्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही ब्रिज एकमेकांना कनेक्ट होतील. यापैकी एक पूल पूर्व-पश्चिमेकडे तर दुसरा एलिव्हेटेड रोड उत्तर-दक्षिण दिशेने जाईल. हे पूल पश्चिमेकडील परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करतील.










