"मला त्या PSI ने त्रास..." लातूरमध्ये तरुणाने संपवलं जीवन अन् पोलीस कर्मचाऱ्यांवर केले गंभीर आरोप!
लातूर जिल्ह्यातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका 22 वर्षीय तरुणाने स्वत:चं जीवन संपवलं असून त्याने तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लातूरमध्ये तरुणाने संपवलं जीवन...
व्हिडीओ बनवून पोलीस कर्मचाऱ्यांवर केले गंभीर आरोप!
Latur Crime: लातूर जिल्ह्यातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका 22 वर्षीय तरुणाने स्वत:चं जीवन संपवलं असून त्याने तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. इम्रान खलील बेलुरे अशी मृताची ओळख समोर आली असून तो जिल्ह्यातील औराद शाहजनी गावाचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आरोप...
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित इम्रान बेलुरे याने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आत्महत्या केली. काही वर्षांपूर्वी, संबंधित तरुणावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यातून ही बाब समोर आली. यामध्ये त्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि वाहन चालक तानाजी टेळे यांच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट केलं. सबंधित पोलीस अधिकारी आणि त्याच्या चालकावर कारवाई करावी अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली.
हे ही वाचा: नागपूर: किरकोळ वादातून शेजारच्या तरुणाने केली माय-लेकीची निर्घृण हत्या.. दारूच्या नशेत आरोपीचं भयंकर कृत्य!
मृत तरुणाने व्हिडीओ बनवला अन् म्हणाला की...
या घटनेमुळे मृत तरुणाचे कुटुंबीय आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. गुरुवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर, पीडित तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला आणि घटनेतील आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. इम्रानने 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास तेरणा नदीकाठच्या झाडीत संबंधित पोलीस कर्माचाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ बनवला. या व्हिडीओमध्ये पीडित तरुण म्हणाला की, "मला त्या पीएसआयने त्रास दिला. आता मी असह्य झालो आहे. माझ्याकडून चोरीचा गु्न्हा झाला, पण मी तसं करायला नको होतं. माझी चूक झाली. त्यानंतर मला आणि माझ्या परिवाराला रात्री-अपरात्री त्रास देण्याचं काम सुरू केलं. आता मला सहन होत नाही. त्यामुळे मी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करतो. याला सर्वस्वी जबाबदार तो पीएसआय आणि त्याचा ड्रायव्हर आहे."
हे ही वाचा: मुंबई: पहिल्या पतीपासून पोटगीची मागणी; पण, दुसऱ्या पतीच्या साक्षीमुळे खटल्याचा निकाल पलटला अन्...
औराद पोलीस स्टेशनचे अधिकारी सुधीर सूर्यवंशी यांच्या माहितीनुसार, मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधिकारी विठ्ठल दुरपडे, कॉन्स्टेबल तानाजी टेळे आणि हेड कॉन्स्टेबल विलास पाटोदकर यांच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










