आहिल्यानगर: रेल्वे ट्रॅकवरुन जाताना युवक मोबाईलवर बोलण्यात मग्न, तितक्यात गोवा एक्सप्रेस आली अन् चिरडून गेली
Ahilyanagar Railway Accident : याच वेळी गोव्याच्या दिशेने जाणारी गोवा एक्सप्रेस प्रचंड वेगाने त्या मार्गावरून येत होती. इंजिन चालकाने हॉर्न वाजवून इशारा देण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईलवरील संभाषणात मग्न असलेल्या दत्तात्रय यांच्या लक्षात हा इशारा आला नाही. काही क्षणांतच रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अहमदनगर : रेल्वे ट्रॅकवरुन चालत जाताना युवक मोबाईलवर बोलण्यात मग्न,
तितक्यात गोवा एक्सप्रेस आली अन् चिरडून गेली
Ahilyanagar Railway Accident, राहुरी (जि. अहिल्यानगर) : मोबाईलवर सुरू असलेल्या संभाषणात इतका गुंतलेला की आपण नेमके कुठे चाललो आहोत, याचेही भान राहिले नाही. रेल्वे ट्रॅकवरून चालत जात असताना क्षणभरातच समोरून वेगाने आलेल्या गोवा एक्सप्रेसने धडक दिली आणि एका निष्पाप जीवाचा अंत झाला. राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी (दि. 27) सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या अपघातात दत्तात्रय अंबादास चव्हाण (वय ४६, रा. तांदूळवाडी, ता. राहुरी) यांचा जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय हे सकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातून जात असताना मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ते चालताना पूर्णपणे फोनकडे लक्ष देऊन बोलत होते. याच दरम्यान ते अनवधानाने रेल्वे रुळावर आले, मात्र त्यांना याची जाणीवच झाली नाही.
याच वेळी गोव्याच्या दिशेने जाणारी गोवा एक्सप्रेस प्रचंड वेगाने त्या मार्गावरून येत होती. इंजिन चालकाने हॉर्न वाजवून इशारा देण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईलवरील संभाषणात मग्न असलेल्या दत्तात्रय यांच्या लक्षात हा इशारा आला नाही. काही क्षणांतच रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.










