इंस्टाग्रामवर ओळख, कालांतराने प्रेमसंबंध अन् अल्पवयीन असतानाच लग्न! पण, प्रकरण थेट पोलिसात अन् घडलं भयंकर..
17 वर्षीय अल्पवयीन पीडिता घरातून अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. कुटुंबियांनी त्वरीत सिव्हिल लाइंस पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इंस्टाग्रामवर ओळख अन् कालांतराने प्रेमसंबंध
अल्पवयीन असतानाच दोघांनी केलं लग्न!
प्रकरण थेट पोलिसात अन् घडलं भयंकर..
Crime News: दिल्लीच्या सिव्हिल लाइंस परिसरात अचानक एक तरुणी तिच्या घरातून गायब झाली. 17 वर्षीय अल्पवयीन पीडिता घरातून अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. कुटुंबियांनी त्वरीत सिव्हिल लाइंस पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर, आयपीसीच्या कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडिता अल्पवयीन असल्याकारणाने प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या घटनेच्या तपासाची जबाबदारी क्राइम ब्रांचच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटकडे सोपवली.
त्यानंतर, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं. टीमने तपासादरम्यान, मुलीचे आई-वडील, नातेवाईक आणि मित्रांची चौकशी केली आणि सर्व बाजू विचारात घेतल्या गेल्या. मोबाईल कॉल डिटेल्स, सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी आणि टेक्निकल सर्व्हिलांसच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले.
हे ही वाचा: Survey: मुंबईत ठाकरेंना बसणार मोठा फटका, मुस्लिम मतदारांचा 'तो' निर्णय सेना-मनसेचं वाढवणार प्रचंड टेन्शन!
प्रकरणाच्या तपासादरम्यान, एक महत्त्वाची बाब सर्वांसमोर आली. इंस्टाग्रामच्या माध्यमातून अल्पवयीन पीडितेची एका तरुणाशी ओळख झाली होती. कालांतराने, त्यांच्यातील बोलणं वाढत गेलं आणि दोन वर्षांमध्ये त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. 26 मे रोजी पीडिता घरी कोणालाच न सांगता बेपत्ता झाली आणि दिल्लीच्या बवाना परिसरात तिच्या प्रियकरासोबत राहू लागली. कुटुंबियांना याची काहीच कल्पना नव्हती.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांनो! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 12 स्पेशल लोकल धावणार...
हेड कॉन्स्टेबलना मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने बवाना येथील रमेश कॉलनीजवळील एका परिसरात छापा टाकला. बऱ्याच तासांच्या शोधानंतर, पथकाने अखेर तरुणीला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं आणि तरुणी सुरक्षित असल्याचं पाहून पोलीस तसेच तिच्या कुटुंबियांना सुद्धा दिलासा मिळाला. संबंधित मुलगी ही 8 वी पर्यंतच शिकली असून तिला तीन भाऊ-बहीण असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. त्यानंतर, तिने तिच्या प्रियकरासोबत पळून जाऊन त्याच्याशी लग्न केलं. तरुणी सापडल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.










