मालेगाव महापालिका निवडणूक 2017 मध्ये काँग्रेसनं विरोधकांचा उडवला होता धुव्वा, आता 2026 मध्ये काय होणार?

मुंबई तक

Malegoan Muncipal Corporation : मालेगाव महापालिका निवडणूक 2017 मध्ये 84 जागांवर सर्व पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यापैकी महापालिकेत काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

ADVERTISEMENT

Malegoan Muncipal Corporation
Malegoan Muncipal Corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मालेगाव महापालिका निवडणूक 2017 मध्ये काँग्रेस विजयी

point

मालेगाव महापालिका निवडणूक 2017 मधील नेतृत्व

point

मतदार यादीत नाव कसे तपासायचे?

Malegoan Muncipal Corporation : मालेगाव महानगरपालिका ही राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराची शासकीय संस्था आहे. ही संस्था शहराच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि पोलिस व्यवस्था सांभाळण्याचे काम करते. याच महापालिकेची स्थापना ही 17 डिसेंबर 2001 रोजी झाली होती. याच महापालिकेचा थोडक्यात इतिहास आणि अंतिम झालेल्या निवडणुकीची माहिती खालीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मालेगाव महापालिका निवडणूक 2017 मध्ये काँग्रेस विजयी

मालेगाव महापालिका निवडणूक 2017 मध्ये 84 जागांवर सर्व पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यापैकी महापालिकेत काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 26 जागांवर विजय मिळवला. शिवसेनेच्या 13 उमेदवारांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे एमआयएमच्या उमेदवारांनी 7 जागांवर आपला विजय मिळवला. तसेच भारतीय जनता पार्टीने 9 जागांवर विजय मिळवला होता. तसेच जनता दलाने 7 जागांवर विजय मिळवला होता. यापैकी सर्वाधिक मतं ही काँग्रेसचीच होती. थोडक्यात काय तर 2017 मध्ये काँग्रेसची सत्ता होती.  

मालेगाव महापालिका निवडणूक 2017 मधील नेतृत्व

महापौर - ताहेरा शेख रशीद (INC), उपमहापौर - निलेश अहेर (SS), आयुक्त - रवींद्र जाधव (IAS). सध्या महानगरपालिका प्रशासकाच्या अधिपत्याखाली चालते. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 2025-26 मध्ये होत आहेत, ज्यात मालेगावचा समावेश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp