एकनाथ शिंदे यांचा सख्खा भाचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत, मुंबईच्या 'या' प्रभागातून लढणार निवडणूक?

मुंबई तक

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सख्खा भाचा आशिष माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. यामुळे आता मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

ADVERTISEMENT

mumbai news
mumbai news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे यांचा सख्खा भाचा अजितदादांसोबत

point

भाजपला धक्कातंत्र?

Mumbai News : मुंबई महापालिका ही ठाकरेंसाठी एक प्रतिष्ठेची लढत आहे. याच महापालिकेभोवती देशाचं राजकारण फिरताना दिसत आहे. अशातच या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेते मंडळी हे महाविकास आघाडीतील नेते, कार्यकारी आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेत आहेत. कुठेतरी दोस्तीत कुस्ती बघायला मिळत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सख्खा भाचा आशिष शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. यामुळे आता मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

हे ही वाचा : सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काँग्रेसचा उमेदवार MIM च्या गळाला

एकनाथ शिंदेंच्या भाच्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्र. 159 येथूनआशिष माने यांना उमेदवारी देणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना मुंबईत याचा फटका बसू शकतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळेच आता मुंबईत दोस्तीत कुस्ती सुरु झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे. एकनाथ शिंदे यांचा भाचा 174 मधून निवडणूक लढवणार आहे, तर दुसरीकडे भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांना 156 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

भाजपला धक्कातंत्र?

यामुळे आता मुंबईत भाजपला कुठेतरी धक्कातंत्र दिलं जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे राजकारण चांगलंच तापलंय. दरम्यान, या 29 महापालिका निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून अर्जाची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया असणार आहे. तर 2 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. तसेच मतदान 15, तर मतमोजणी 16 रोजी होणार असून निकाल जाहीर होईल.

हे ही वाचा : 'आई कुठे काय करते'? मालिकेतील अभिनेत्रीच्या सूनेचं कांड आलं समोर, तब्बल दीड कोटींची खंडणी

याच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा अजूनही सुटता सुटेनासा झाला. मुंबईसह ठाणे आणि इतर काही महापालिकांमध्ये शिंदे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवतील. तर पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp