मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबई महापालिका निवडणूक उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून ती खालीलप्रमाणे नमूद करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे...
मुंबईच्या एकूण 36 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढणार
Mumbai News : मुंबई महापालिकेत ठाकरेंना शह देण्यासाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच महायुतीनं देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित दादांनी आपल्या राष्ट्रवादीच्या मुंबईच्या एकूण 36 उमेदवारांची यादी 28 डिसेंबर रोजी जाहीर झाली आहे, ती यादी पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे. भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीत नवाब मलिक यांचे नेतृत्व मान्य नसल्याचं सांगण्यात आलं. यामुळे आता अजितदादा मुंबईतून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे...

भाजपला मलिकांचं नेतृत्व अमान्य
दरम्यान, बृहन्मुंबई महापालिका निवडणूक महायुतीतून लढवली जावी यासाठी राष्ट्रवादीने अतोनात प्रयत्न केला. पण, त्यांचे प्रस्ताव महायुतीने धुडकावले. तसेच आपल्याला नवाब मलिक यांचे नेतृत्व मान्य नसल्याचं सांगत, त्यांचं नेतृत्व बाजूला करण्यास सांगितलं, मात्र राष्ट्रवादीने ते अमान्य केलं आणि दुसरीकडे लेक सना मलिक यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे.










