मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी, नवनाथ बन ते नील सोमय्या कोणा-कोणाला संधी?

मुंबई तक

BJP first Candidate list for Mumbai Mahapalika election 2026 : याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हे देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सक्रिय होणार असून, मानखुर्द–शिवाजीनगर येथील प्रभाग क्रमांक 135 मधून ते निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

ADVERTISEMENT

BJP first Candidate list for Mumbai Mahapalika election 2026
BJP first Candidate list for Mumbai Mahapalika election 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी

point

नवनाथ बन ते तेजस्वी घोसाळकर कोणा-कोणाला संधी?

BJP first Candidate list for Mumbai Mahapalika election 2026 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या काही प्रमुख उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9, तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून पक्षाकडून मैदानात उतरवण्यात आले आहे.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हे देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सक्रिय होणार असून, मानखुर्द–शिवाजीनगर येथील प्रभाग क्रमांक 135 मधून ते निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

या सर्व उमेदवारांनी आजच आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत, अशा सूचना भाजपकडून देण्यात आल्याची माहिती आहे. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच संबंधित उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपकडून ही यादी थोड्याच वेळात औपचारिकरीत्या जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप तब्बल 128 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ आज आणि उद्या असे दोन दिवस शिल्लक असतानाही, अंतिम यादी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाहीर न केल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते.

हे वाचलं का?

    follow whatsapp