मुंबईची खबर: दादर स्थानकावरील गर्दी कमी होणार! रेल्वे आणखी एक नवं प्लॅटफॉर्म उभारणार...
दादर स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने या स्थानकावर एक नवे प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दादर स्थानकावरील गर्दी कमी होणार!
रेल्वे आणखी एक नवं प्लॅटफॉर्म उभारणार...
Mumbai News: दादर स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने या स्थानकावर एक नवे प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 च्या बाजूला हे नवीन प्लॅटफॉर्म बांधलं जाईल. या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि भविष्यात वाढत्या प्रवासी संख्येचे तसेच गाड्यांचे व्यवस्थापन सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 7 सोबत नवीन प्लॅटफॉर्म
खरं तर, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोघांसाठी दादर रेल्वे स्थानक महत्त्वाचं जंक्शन आहे. या स्टेशनवरून दररोज सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. सध्या पश्चिम रेल्वेसाठी 1 ते 7 क्रमांकाचे प्लॅटफॉर्म आहेत, तर मध्य रेल्वेसाठी 8 ते 14 क्रमांकाचे प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 सोबत एक नवीन प्लॅटफॉर्म जोडल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांचं व्यवस्थापन सुलभ होणार आहे.
हे ही वाचा: Govt Job: भारतातील मोठ्या कंपनीत मिळवा सरकारी नोकरी! 'इंडियन ऑइल'च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अप्लाय...
नव्या प्लॅटफॉर्मला 7A क्रमांक देण्याचा विचार
दादर येथील पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 ला लागून नव्या प्लॅटफॉर्मची निर्मिती झाल्यानंतर, त्याला '7A' क्रमांक देण्याचा रेल्वे विचार करत आहे. कारण, या नव्या फलाटाला 8 क्रमांक दिल्याने सेंट्रल रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर्स बदलावे लागतील. यासोबतच, साइनबोर्ड आणि पब्लिक अनाउंसमेंट सिस्टममध्ये देखील बदल करावे लागतील. त्यामुळे, हा गोंधळ टाळण्यासाठी नव्या प्लॅटफॉर्मला 7A क्रमांक देण्याचा विचार केला जात आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नाही.
हे ही वाचा: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अंतर्गत असंतोषाचा भडका, इच्छुकांची अन् उमेदवारांचीही डोकेदुखी वाढली
गाड्यांचं व्यवस्थापन सुलभ करण्याच्या दृष्टीने निर्णय
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल डिव्हिजनच्या कित्येक लांब पल्ल्याच्या गाड्या दादर स्थानकावरून निघतात किंवा येतात. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी फक्त दोन टर्मिनल लाईन्स वापरल्या जातात. सहाव्या लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात अशा गाड्यांचं व्यवस्थापन करणं कठीण होईल. त्यामुळे, प्लॅटफॉर्म क्रमांक 7 जवळ आणखी एक प्लॅटफॉर्म बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन प्लॅटफॉर्ममुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे व्यवस्थापन करणं सोपं होणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. भविष्यातील ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या दृष्टीने रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.










