मनसेकडून यशवंत किल्लेदारांना उमेदवारी, नाराज झालेल्या प्रकाश पाटणकरांनी थेट शिंदेंना गाठलं, AB फॉर्म मिळवला

मुंबई तक

Mumbai Mahapalika election 2026 : 192 वॉर्ड हा दादरमधील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा वॉर्ड मानला जातो. मनसेने येथून यशवंत किल्लेदार यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली. मात्र या निर्णयामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. विशेषतः प्रकाश पाटणकर यांना या वॉर्डमधून संधी मिळेल अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा फोल ठरताच पाटणकरांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटाचा रस्ता धरला.

ADVERTISEMENT

Mumbai Mahapalika election 2026
Mumbai Mahapalika election 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनसेकडून यशवंत किल्लेदारांना उमेदवारी

point

नाराज झालेल्या प्रकाश पाटणकरांनी थेट शिंदेंना गाठलं, AB फॉर्म मिळवला

point

शिंदे गटातही नाराजीचे सूर

Mumbai Mahapalika election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी दोन्ही नेत्यांना काही कार्यकर्त्यांची नाराजी दूर कठीण बनले आहे. दादरमधील 192 वॉर्डमध्ये उमेदवारीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, एकाच वेळी दोन पक्षांत नाराजीचं नाट्य उघड झालं आहे. मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर होताच, ठाकरे गटातील जुने पदाधिकारी प्रकाश पाटणकर नाराज झाले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर पाटणकरांना शिवसेना (शिंदे गट) कडून एबी फॉर्म देण्यात आला आहे.

192 वॉर्ड हा दादरमधील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा वॉर्ड मानला जातो. मनसेने येथून यशवंत किल्लेदार यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली. मात्र या निर्णयामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. विशेषतः प्रकाश पाटणकर यांना या वॉर्डमधून संधी मिळेल अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा फोल ठरताच पाटणकरांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटाचा रस्ता धरला. पाटणकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना अधिकृतपणे एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे 192 वॉर्डमध्ये आता थेट मनसे आणि शिंदे गट यांच्यात लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. मात्र इथेच राजकीय समीकरण आणखी गुंतागुंतीचं झालं आहे.

याच वॉर्डमधून माजी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक आणि शिंदे गटातील इच्छुक उमेदवार कुणाल वाडेकर यांचा ऐनवेळी पत्ता कट झाल्याने शिंदे सेनेतच नाराजीचा उद्रेक झाला आहे. कुणाल वाडेकर हे विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहत होते आणि ते या वॉर्डमधून उमेदवारीसाठी आघाडीवर होते. मात्र एबी फॉर्म थेट प्रकाश पाटणकरांना मिळाल्याने वाडेकर समर्थकांमध्ये असंतोष पसरला आहे.

या नाराजीला अधिक धार देत कुणाल वाडेकर (विधानसभा प्रमुख), निकेत पाटील (उपविभाग प्रमुख) आणि अभिजित राणे (शाखाप्रमुख – 192) यांनी पक्ष नेतृत्वाला थेट निर्वाणीचा इशारा दिल्याची चर्चा आहे. “स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जात असेल, तर याचा विचार करावा लागेल,” असा सूर या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp