BMC Election: रात्री प्रचंड मोठ्या घडामोडी, शेवटच्या क्षणी शिवसेना-भाजपने केली 'ती' घोषणा!

मुंबई तक

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अगदी शेवटच्या क्षणी महायुतीने आपलं जागा वाटप जाहीर केलं आहे. त्यानुसार भाजप 137 आणि शिवसेना 90 जागा लढवणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील चर्चेनंतर जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले असून, भाजप १३७ जागा लढवणार आहे, तर शिवसेना (शिंदे गट) ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे. एकूण २२७ जागांवर महायुती एकत्रितपणे लढणार असून, इतर घटक पक्षांना या दोन्ही पक्षांच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी बैठकीनंतर माध्यमांना ही माहिती दिली. ते म्हणाले, 

'मुंबईवर हिंदुत्वाचा महापौर निवडून येईल'

"भाजप-शिवसेना-रिपाईची महायुती मुंबई महापालिकेच्या २२७ जागा लढणार आहे. यात भाजपला १३७ जागा आणि शिवसेनेला ९० जागा असे वाटप झाले आहे. महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यातच समाविष्ट केले जातील. येणाऱ्या काळात एकत्रित प्रचाराचा शुभारंभ होईल. मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा आणि महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी मुंबईकरांचा महापौर निवडून आणला पाहिजे. मुंबईच्या विकासाबरोबरच शहराची सुरक्षितता अबाधित राहील आणि शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींचा पराभव होईल."

हे ही वाचा>> अखेर किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर, हातातील एबी फॉर्म दाखवत मातोश्रीबाहेर येऊन दिली पहिली प्रतिक्रिया

साटम यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले, "आता एक नवीन 'मामूंची टोळी' शहराचा ताबा घेऊ इच्छिते. त्यांना घरी पाठवण्याचे काम महायुती करेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. आज रात्रीपर्यंत सर्व उमेदवारांना सूचित केले जाईल. याआधी २०० पेक्षा अधिक जागांवर एकमत झाले होते, फक्त २० जागांची चर्चा बाकी होती. त्यामुळे काही उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित महायुतीचे उमेदवार उद्या अर्ज दाखल करतील."

बंडखोरीच्या प्रश्नावर साटम म्हणाले, "बंडखोरी दिसते, पण ती मुंबईचा रंग बदलू इच्छिणाऱ्यांच्या पक्षातून येते. उबाठा आणि मनसेतील इच्छुक कार्यकर्ते बंडखोरी करताना दिसत आहेत. आमच्याकडे कोणाचीही नाराजी नाही. सर्वांना सामावून घेऊन एकमताने निर्णय घेतला आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp