अखेर किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर, हातातील एबी फॉर्म दाखवत मातोश्रीबाहेर येऊन दिली पहिली प्रतिक्रिया
Kishori Pendnekar : किशोरी पेडणेकरांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हातातील एबी फॉर्म दाखवत प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एबी फॉर्म दाखवत काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
एबी फॉर्म मिळण्यास विलंब का?
Kishori Pendnekar : देशातील आर्थिकदृष्टया महत्त्वाची महापालिका म्हणून मुंबईची ओळख आहे. याच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली जोरदार तयारी करत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिलेदार किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म देण्यासाठी प्रतिक्षेत ठेवण्यात आलं होतं. पण आता त्यांनी 29 डिसेंबर रोजी मातोश्रीबाहेर पत्रकार परिषद घेत एबी फॉर्म दाखवत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
हे ही वाचा : 'जिथं अशोक चव्हाण तिथं आम्ही', असंख्य मुस्लिम बांधवांचा अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
एबी फॉर्म दाखवत काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
मंगळवारी किशोरी पेडणेकर मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. तसेच त्यांचे ठाकरेंच्या उमेदवारी यादीत नाव नसल्यानं कुठेतरी अंतर्गत नाराजी नाट्याला सुरुवात झाली की काय? अशी संभावना होती. पण, किशोरी पेडणेकरांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हातातील एबी फॉर्म दाखवत आपली प्रतिक्रिया दिली.
एबी फॉर्म मिळण्यास विलंब का?
निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक प्रोसेस असते. आपण जागा नेमकी कुठे आणि कशी सोडतोय? या गोष्टी पक्षप्रमुखांनुसारच होत्या. बऱ्यापैकी एबी फॉर्म हे मिळालेले आहेत. हाच फॉर्म मला देखील मिळालेला आहे. शाखा प्रमुखाच्या पत्नीला देखील देण्यात आला आहे. फक्त एक वॉर्ड आम्हाला सोडण्यात आलेला नाही, ते लवकर कळेल. हा फॉर्म आम्हाला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मिळाला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी सुरु असल्याने वेळ लागला.
हे ही वाचा : पुण्यात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, रमेश वांजळेंची लेक महापालिका निवडणुकीच्या मैदानात










