'जिथं अशोक चव्हाण तिथं आम्ही', असंख्य मुस्लिम बांधवांचा अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
ashok chavan : नांदेडमध्ये भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत अंदाजे 500 ते 600 मुस्लिम बांधवांनी दि : 28 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु
मुस्लिम बांधवांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश
'जिथं अशोक चव्हाण तिथं आम्ही'
Ashok Chavan : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. अशातच आता नांदेडमध्ये भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत अंदाजे 500 ते 600 मुस्लिम बांधवांनी दि : 28 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे नांदेडच्या राजकीय घडामोडीत कुठेतरी बदल होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : पुण्यात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, रमेश वांजळेंची लेक महापालिका निवडणुकीच्या मैदानात
मुस्लिम बांधवांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश
अशोक चव्हाण हे काँग्रेसचे माजी नेते होते. त्यानंतर नुकतेच त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत नांदेडच्या असंख्य मुस्लिम बांधवांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. याचा चांगला फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. अनेकदा मुस्लिमांची मते मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असतो, पण तो प्रयत्न अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेडमध्ये सफल होणं सहज शक्य झालं आहे.
हे ही वाचा : काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर
'जिथं अशोक चव्हाण तिथं आम्ही'
काही मुस्लिम बांधवांनी सांगितलं की, "अशोक चव्हाण ज्या पक्षात असतील त्याच पक्षात आम्ही जाणार. आम्ही त्यांना नेहमी साथ देणार आहोत, अशी मुस्लिम बांधवांनी भाजप प्रवेशानंतर प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिम बांधवांनी भाजपात केलेल्या या प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.










