'या' राशीत लागणार चंद्रग्रहण, भीती नको; प्रेमानंद महाराजांनी सूतक काळासाठी सांगितले 'हे' उपाय
Premanand maharaj on Lunar Eclipse : ग्रहणादरम्यान काय करावे आणि काय करू नये, ग्रहण होळीच्या सणादरम्यान येत असल्याने त्याचा काय परिणाम होणार असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्या शंकांचे महाराजांनी अत्यंत सविस्तरपणे आणि प्रेमाने भक्तांच्या निरसन केले. महाराजांनी सर्वात पहिली गोष्ट ही सांगितली की, ग्रहणाच्या वेळी घाबरण्याची गरज नाही, तर सावध राहण्याची गरज आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'या' राशीत लागणार चंद्रग्रहण, भीती नको
प्रेमानंद महाराजांनी सूतक काळासाठी सांगितले 'हे' उपाय
Premanand maharaj on Lunar Eclipse : प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. भक्तांच्या प्रश्नांना ते सोप्या भाषेत आणि प्रेमळपणे उत्तर देतात की ते ऐकून मनाला शांती मिळते. भक्त महाराजांना केवळ भक्तीच्या मार्गाबद्दलच विचारत नाहीत, तर आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणींवरही तोडगा मागतात. अलीकडेच एका भक्ताने महाराजांना 2026 मध्ये होणाऱ्या चंद्रग्रहणाबाबत अनेक प्रश्न विचारले. ग्रहणादरम्यान काय करावे आणि काय करू नये, ग्रहण होळीच्या सणादरम्यान येत असल्याने त्याचा काय परिणाम होणार असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्या शंकांचे महाराजांनी अत्यंत सविस्तरपणे आणि प्रेमाने भक्तांच्या निरसन केले. महाराजांनी सर्वात पहिली गोष्ट ही सांगितली की, ग्रहणाच्या वेळी घाबरण्याची गरज नाही, तर सावध राहण्याची गरज आहे.
प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, या काळात बाह्य वातावरणात अशुद्धी किंवा नकारात्मक ऊर्जा वाढते. यापासून वाचण्याचा सर्वात अचूक उपाय म्हणजे नाम जप. तुम्ही तुमच्या इष्ट देवाचे नाव घ्या, गुरुमंत्राचा जप करा किंवा गायत्री मंत्र म्हणा. महाराजांच्या मते, या काळात मनात देवाचे स्मरण करणे हेच तुम्हाला सर्व प्रकारच्या अशुभ प्रभावांपासून वाचवणारे सर्वात मोठे कवच आहे. हे केवळ भीतीच घालवत नाही, तर तुमची एकाग्रता देखील विलक्षण पद्धतीने वाढवते.
ग्रहणाआधी काय करावे?
महाराजांनी केवळ ग्रहणाच्या वेळेचीच नाही, तर त्यापूर्वीची दिनचर्या देखील सांगितली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ग्रहण सुरू होण्याच्या साधारण एक तास आधी प्रत्येकाने स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून घरातील शांत ठिकाणी किंवा पूजास्थानी आसन लावून बसावे आणि प्रभूच्या नामात मग्न व्हावे. जर तुम्ही स्वतःला अशा प्रकारे तयार केले, तर ग्रहणाच्या नकारात्मक ऊर्जेचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, उलट तुम्हाला मानसिक शांती मिळेल. महाराजांनी हे देखील समजावून सांगितले की, जेव्हा ग्रहण संपेल तेव्हा लगेच सामान्य दिनचर्येकडे वळू नका. ग्रहण संपल्यानंतरही सुमारे अर्धा तास जप सुरू ठेवावा. त्यानंतर पुन्हा एकदा स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण कराल, त्यानंतरच तुम्ही भोजन करावे किंवा इतर कोणतेही सांसारिक काम करावे. हा नियम मन आणि शरीर या दोघांच्या शुद्धीसाठी सांगितला आहे.
'या' राशीत लागणार ग्रहण
यावेळचे चंद्रग्रहण अत्यंत खास मानले जात आहे, कारण ते 3 मार्च 2026 रोजी होत असून याच दिवशी होलिका दहन देखील आहे. हे ग्रहण सिंह राशीत लागेल. होळीसारखा मोठा सण आणि त्यावर ग्रहण हा संयोग अत्यंत दुर्मिळ आहे. महाराजांचे भक्त याकडे एक संधी म्हणून पाहत आहेत. आध्यात्मिक दृष्टीने असे म्हटले जात आहे की, या दिवशी केलेली साधना अत्यंत फलदायी असते, कारण हा काळ नकारात्मकता संपवून सकारात्मकतेकडे नेणारा असतो.










