अक्षय्य तृतीयेला तयार होतोय दुर्मीळ योग, 'या' राशींच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार; आयुष्यात बदल होण्याचे संकेत

मुंबई तक

यंदाची अक्षय्य तृतीया अत्यंत शुभ मानली जात आहे, कारण यावेळी अनेक दुर्मिळ योगायोग घडून येत आहेत. या दिवशी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल. याशिवाय, याच दिवशी चंद्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करेल. तसेच, याच दिवशी गजकेसरी योगाची निर्मिती देखील होत आहे.

ADVERTISEMENT

akshaya tritiya 2026
akshaya tritiya 2026
google news

बातम्या हायलाइट

point

अक्षय्य तृतीयेला तयार होतोय दुर्मिळ योग

point

'या' राशींच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार

point

आयुष्यात बदल होण्याचे संकेत

Akshaya Tritiya Rashifal 2026 : वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. या दिवशी सूर्य आणि चंद्र हे दोन्ही आपल्या उच्च राशीत असतात. या दोघांच्या एकत्रित कृपेचे फळ अक्षय मिळते. अक्षय्य शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचा कधीही क्षय (नाश) होत नाही. या तिथीला केलेल्या कार्यांच्या परिणामांचा क्षय होत नाही.

ज्योतिषांनुसार, यंदाची अक्षय्य तृतीया अत्यंत शुभ मानली जात आहे, कारण यावेळी अनेक दुर्मिळ योगायोग घडून येत आहेत. या दिवशी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल. याशिवाय, याच दिवशी चंद्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करेल. तसेच, याच दिवशी गजकेसरी योगाची निर्मिती देखील होत आहे. याचा लाभ कोणत्या राशींच्या नशीबात असणार आहे, जाणून घेऊया.

'या' राशींच्या लोकांची अक्षय्य तृतीया असेल खास

मेष : अक्षय्य तृतीयेचा काळ मेष राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये चांगले बदल घेऊन येऊ शकतो. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची प्रतीक्षा करत आहेत, त्यांना आता दिलासा मिळू शकतो. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याचे संकेत आहेत. कामकाजात एखादी मोठी संधी किंवा डील हाती लागू शकते, ज्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. 

हे ही वाचा : बापरे.. अवघ्या काही तासात ट्रम्प टाकणार इराणवर अणूबॉम्ब? अवघ्या जगाची उडाली झोप!

सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मान-सन्मान आणि ओळख वाढवणारा असेल. तुमच्या नेतृत्त्वक्षमतेचे कौतुक होऊ शकते. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये फायदा मिळण्याचे योग आहेत. कुटुंबाशी संबंधित जुने वाद, विशेषतः मालमत्तेशी संबंधित, सुटू शकतात. यामुळे तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते.

हे वाचलं का?