मुंबई: "मी सरन्यायाधीश चंद्रचूड..." खोटी ओळख अन् महिलेकडून तब्बल 3.71 कोटी रुपये उकळले!
एका वृद्ध महिलेकडून सायबर भामट्यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड अशी बनावट ओळख सांगून तब्बल 3.71 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची खोटी ओळख अन्...
मुंबईतील वृद्ध महिलेकडून तब्बल 3.71 कोटी रुपये उकळले!
Mumbai Crime: मुंबईतून सायबर फ्रॉडचं एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील रहिवासी असलेल्या एका वृद्ध महिलेकडून सायबर भामट्यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड अशी बनावट ओळख सांगून तब्बल 3.71 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणासंदर्भात, पोलिसांनी गुजरातमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना 18 ऑगस्ट ते 13 ऑक्टोबर दरम्यान घडली असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरण 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी देऊन पीडितेची फसवणूक करण्यात आली होती.
डिजीटल अरेस्टची भिती दाखवून खात्याची माहिती...
18 ऑगस्ट रोजी महिलेला एक फोन कॉल आला आणि तेव्हापासून फसवणूकीला सुरूवात झाली. फोन करणाऱ्या आरोपीने स्वतःची ओळख कुलाबा पोलीस स्टेशनमधील अधिकारी म्हणून करून दिली आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी संबंधित महिलेच्या बँक खात्याचा वापर केला जात असल्याचं त्याने पीडितेला सांगितलं. त्याने तिच्या बँक खात्याची माहिती मागितली आणि याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. एसके जयस्वाल म्हणून स्वतःला सादर करून, आरोपीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पीडितेला डिजीटल अरेस्टची भिती दाखवली आणि तिला जामीन मिळवून देण्याचं देखील त्याने आश्वासन दिलं.
हे ही वाचा: रागाच्या भरात चाकू भोसकून पत्नीची हत्या अन् नंतर, फाशी घेत आत्महत्या... शेजाऱ्यांनी सांगितलं कारण
वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 3.75 कोटी रुपये ट्रान्सफर
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कोर्ट रूममध्ये एका व्यक्तीला सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणून पीडितेसमोर सादर केलं. तिच्या बँक खात्यातील गुंतवणुकीच्या व्हेरिफिकेशनसाठी तिच्याकडे बँक खात्याची माहिती मागितली तसेच काही रक्कम पाठवण्यास सांगितली. पीडितेने दोन महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 3.75 कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर, महिलेने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींचा फोन बंद लागत असल्याने आपली फसवणूक करण्यात आल्याची तिला जाणीव झाली.
हे ही वाचा: नंदुरबार: निर्दयी आई-वडिलांचं धक्कादायक कृत्य; नदीत फेकलं चिमुकल्या अर्भकाचं प्रेत अन्...
पोलिसांची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने पश्चिम विभाग सायबर पोलीस स्थानकाशी संपर्क साधल्यानंतर, भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक तसेच इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. खरं तर, पीडितेचे पैसे हे बऱ्याच 'म्यूल' खात्यांमध्ये ट्रान्सफर केले गेले होते, त्यापैकी एक गुजरातमधील सुरतमध्ये आढळून आल्याचं तपासात समोर आलं. 'म्यूल' म्हणजे एक बँक खातं ज्याचा वापर गुन्हेगार खातेधारकाच्या माहितीशिवाय किंवा त्याच्या माहितीशिवाय बेकायदेशीर पैसे मिळविण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी किंवा लॉन्ड्रिंग करण्यासाठी करतात.










