Maharashtra Weather : राज्यात 'या' भागात धुक्याची चादर पसरणार, पुढील 24 तास धोक्याचे; हवामान खात्याचा अलर्ट
maharashtra weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 30 डिसेंबर रोजी राज्यात एकूण कोरडे आणि मुख्यतः निरभ्र हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार
राज्यात एकूण कोरडे राहण्याची शक्यता
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 30 डिसेंबर रोजी राज्यात एकूण कोरडे आणि मुख्यतः निरभ्र हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात सरासरी थंडीची लाट अनुभवायला मिळणार आहे. तर जाणून घेऊयात 30 डिसेंबर रोजी राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : बीड: ऊसतोड कामगाराच्या लेकानं नाव काढलं, पीएसआय बनून बापाच्या कष्टाचं चीज केलं
कोकण विभाग :
कोकण विभागात कोरडे आणि सौम्य वातावरणाची शक्यता आहे. तसेच मुंबईतील तापमान हे 31-32 अंश सेल्सिअस तर, किमान तापमान हे 18-20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सकाळी हलक्या धुक्यांची शक्यता, तसेच दिवसभर सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र विभाग :
पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि नाशिकमध्ये किमान तापमान 0-12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तसेच किमाल तापमान 28-30 अंश राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात थंडावा जाणवणार आहे. तसेच या विभागात हवामान विभागाने 9-12 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता आहे. तसेच कमाल 28-30 अंश राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तापमान कोरडं राहण्याची शक्यता आहे. सकाळी हलके धुके असेल. छत्रपती संभाजीनगर आणि परभणीत भागातच थंडीची शक्यता आहे.










