आहिल्यानगर महानगरपालिका : 2018 साली शिवसेना ठरलेला सर्वात मोठा पक्ष, आता कोण मारणार बाजी?

मुंबई तक

Ahilyanagar Municipal Corporation : डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने 18 जागा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला, तर भाजप 14 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. संख्याबळ कमी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले.

ADVERTISEMENT

Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Municipal Corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आहिल्यानगर महानगरपालिका : 2018 साली शिवसेना ठरलेला सर्वात मोठा पक्ष,

point

आता कोण मारणार बाजी?

Ahilyanagar Municipal Corporation : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची अखेर घोषणा झाल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सध्या बहुतेक महानगरपालिकांवर प्रशासक राजवट सुरू असून, निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांसह नागरिकांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये प्रत्येकी तीन पक्ष असल्याने यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

2023 मध्ये मुदत संपलेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेत मागील दोन वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत. त्यामुळे येथील निवडणूक राजकीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाची मानली जात आहे. 2003 मध्ये अस्तित्वात आलेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या दोन दशकांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या सर्व पक्षांनी महापौरपद भूषवले आहे. सध्याची राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदललेली असली, तरी अधिकाधिक नगरसेवक निवडून आणून महापौरपद आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्धार प्रत्येक पक्षाने केला आहे.

2018 मधील निवडणूक आणि पक्षीय स्थिती

डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने 18 जागा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला, तर भाजप 14 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. संख्याबळ कमी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. यामागे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा पाठिंबा निर्णायक ठरला होता. या घटनेनंतर शरद पवारांकडून संबंधित नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई होईल, अशी जोरदार चर्चा रंगली होती, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही.

आतापर्यंतचे महापौर

हे वाचलं का?

    follow whatsapp