दोन्ही शिवसेनेत घराणेशाही, सदा सरवणकरांचा मुलगा अन् मुलगीही निवडणूक लढणार, युतीचा फॉर्म्युलाही समोर
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : शिंदेंना सुटलेल्या दोन जागांवर माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कुटुंबातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर 194 क्रमांकाच्या वार्डातून निवडणूक लढणार आहेत. तर त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर गुरव या 191 या वार्डमधून निवडणूक लढणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन्ही शिवसेनेत घराणेशाही
सदा सरवणकरांचा मुलगा अन् मुलगीही निवडणूक लढणार
युतीचा फॉर्म्युलाही समोर
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांकडून एबी फॉर्मचं वाटप सुरु असून जवळपास सर्वच जागांवरचे उमेदवार अवघ्या काही तासात जाहीर होतील. मात्र, आत्तापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवार याद्यांमधून सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही असल्याचं स्पष्ट झालंय. दादर - माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेला सहा पैकी चार जागा सुटल्या आहेत. इतर दोन जागा भाजप लढणार आहे. मात्र, शिंदेंना सुटलेल्या दोन जागांवर माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कुटुंबातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर 194 क्रमांकाच्या वार्डातून निवडणूक लढणार आहेत. तर त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर गुरव या 191 या वार्डमधून निवडणूक लढणार आहेत. शिवाय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील घराणेशाही पाहायला मिळत आहे. विनायक राऊत , सुनील प्रभू , हारून खान , प्रकाश फातर्पेकर, अशोक धात्रक या नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिंदेसेनेकडून दादर-माहीमधून कोणाला उमेदवारी?
182 वॉर्ड - मिलिंद तांडेल
191 वॉर्ड - प्रिया सरवणकर गुरव
192 - कुणाल वाडेकर










