मुंबई महानगरपालिका : उद्धव ठाकरेंनी 42 जणांना मातोश्रीवर बोलावून AB फॉर्म दिले, सर्वांची नावं एका क्लिकवर
Mumbai Mahapalika election 2026 : संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेतून कोणाला उमेदवारी मिळू शकते, याबाबत काही नावांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई महानगरपालिका : उद्धव ठाकरेंनी 42 जणांना मातोश्रीवर बोलावून AB फॉर्म दिले
सर्वांची नावं एका क्लिकवर , भाजपविरोधात तगडे मोहरे मैदानात उतरवले
Mumbai Mahapalika election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेनं हालचालींना वेग दिला असून रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर निवडक उमेदवारांची भेट घेत थेट त्यांच्या हाती एबी फॉर्म सुपूर्द केले. उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांना काल रात्री मातोश्री येथे बोलावण्यात आले होते. काही जणांना तत्काळ फॉर्म देण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांना आज सकाळी 11 नंतर फॉर्म मिळणार आहेत. फॉर्म वाटपाची ही संपूर्ण प्रक्रिया कमालीच्या गुप्ततेत पार पाडली जात असून कोणत्या उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आला आहे, याची माहिती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेतून कोणाला उमेदवारी मिळू शकते, याबाबत काही नावांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाणून घेऊयात..
ठाकरे सेनेकडून मुंबईत एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी :
१) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर










