मोठी बातमी : माजी महापौर किशोरी पेडणेकर वेटिंगवर, उमेदवारी जाहीर होईना, पहिल्या यादीत नावही नाही
Former mayor Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर मंगळवारी मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. मात्र उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताना त्यात त्यांचे नाव न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यादी जाहीर झाल्यानंतर त्या मातोश्रीबाहेर पडल्या असल्या तरी त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम अधिकच वाढला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोठी बातमी : माजी महापौर किशोरी पेडणेकर वेटिंगवर
उमेदवारी जाहीर होईना, पहिल्या यादीत नावही नाही
Former mayor Kishori Pednekar : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात हालचालींना वेग आला असतानाच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता कायम आहे. किशोरी पेडणेकर यांचे नाव पहिल्या उमेदवार यादीत नसल्याने त्या सध्या ‘वेटिंग’वर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून 40 पेक्षा जास्त शिवसैनिकांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र, त्यामध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार आहेत? याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
किशोरी पेडणेकर मंगळवारी मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. मात्र उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताना त्यात त्यांचे नाव न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यादी जाहीर झाल्यानंतर त्या मातोश्रीबाहेर पडल्या असल्या तरी त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम अधिकच वाढला आहे.
दरम्यान, ज्या वॉर्ड क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांचे प्रतिनिधित्व राहिले आहे, त्या वॉर्डसंदर्भातही हालचाली वाढल्या आहेत. शाखा क्रमांक 199 चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नी अबोली खाडे यांची मातोश्रीवर उपस्थिती नोंदवण्यात आली. यामुळे वॉर्ड 199 साठी नव्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. किशोरी पेडणेकर यांना पुन्हा संधी दिली जाणार की नव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवला जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेच्या एबी फॉर्मबाबत मोठी अपडेट समोर
मुंबई महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबतचे मनसे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना देण्यात येणारे AB फॉर्मस आज दुपारी मनसे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत हे "राजगड" ह्या पक्षाच्या मुख्य कार्यालयातून देतील. पक्षाच्या वतीने निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांना आगाऊ माहिती कळविली जाईल , त्याप्रमाणे उमेदवार तथा कार्यकर्ते ह्यांनी अत्यंत शिस्तीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पद्धतीने पालन करावे.










