सोलापूर महानगरपालिका : ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्याच महिला नेत्याने प्रणिती शिंदेंना दगा दिला
Solapur Mahapalika Election 2026 : महाविकास आघाडीची सोलापुरात बैठक सुरू असतानाच प्रदेश पातळीवरून सोलापूर महानगरपालिकेच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत प्रभाग क्रमांक 16 मधून फिरदोस पटेल यांच्यासह सीमा यलगुलवार आणि नर्सिंग कोळी यांची नावे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्याच महिला नेत्याने प्रणिती शिंदेंना दगा दिला
सोलापुरात काँग्रेसला मोठा झटका, फिरदोस पटेल यांचा AIMIM मध्ये
Solapur Mahapalika Election 2026 : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या महिला नेत्या फिरदोस पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत AIMIM मध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत नाव असतानाही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काँग्रेसकडून उमेदवारी मिळूनही फिरदोस पटेल यांचा AIMIM मध्ये प्रवेश
महाविकास आघाडीची सोलापुरात बैठक सुरू असतानाच प्रदेश पातळीवरून सोलापूर महानगरपालिकेच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत प्रभाग क्रमांक 16 मधून फिरदोस पटेल यांच्यासह सीमा यलगुलवार आणि नर्सिंग कोळी यांची नावे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली होती. फिरदोस पटेल या प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र रविवारी (28 डिसेंबर) फिरदोस पटेल यांनी AIMIMच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत प्रभाग 16 मधून उमेदवारीची मागणी केली. हा प्रभाग मुस्लिम बहुसंख्याक असल्याने AIMIMकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे AIMIM मध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली.
हेही वाचा : मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी, नवनाथ बन ते नील सोमय्या कोणा-कोणाला संधी?
फिरदोस पटेल प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्या?










