हॉटेल मालकावर पोलिसांना बोलवण्याची वेळ, निलम गोऱ्हेंसमोर भांडणं, AB फॉर्म वाटताना पुण्यात शिंदेसेनेत मोठा गोंधळ
Pune Mahanagar Palika Election 2026 : पुण्यात भाजपकडून जागावाटपाबाबत कोंडी निर्माण झाल्यामुळे शिंदे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. भाजपकडून अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी शिंदेसेनेतील काही नेत्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे. भाजपकडून शिंदेसेनेला 15 जागा सोडण्याची तयारी असल्याचे संकेत असले तरी स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये यावरून नाराजी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हॉटेल मालकावर पोलिसांना बोलवण्याची वेळ
निलम गोऱ्हेंसमोर भांडणं, AB फॉर्म वाटताना पुण्यात शिंदेसेनेत मोठा गोंधळ
Pune Mahanagar Palika Election 2026, पुणे : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारीचे AB फॉर्म वाटप सुरू असतानाच हॉटेलमध्येच वादावादी, घोषणाबाजीचे प्रकार घडल्याने अखेर हॉटेल मालकाला पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. अवघ्या काही तासांत अर्ज भरण्याची मुदत संपणार असल्याने पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळाला.
पुण्यात भाजपकडून जागावाटपाबाबत कोंडी निर्माण झाल्यामुळे शिंदे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. भाजपकडून अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी शिंदेसेनेतील काही नेत्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे. भाजपकडून शिंदेसेनेला 15 जागा सोडण्याची तयारी असल्याचे संकेत असले तरी स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये यावरून नाराजी आहे.
याच नाराजीतून शिंदे गटातील महत्त्वाचे नेते रवींद्र धंगेकर आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी बैठकीतून अचानक बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. उदय सामंत पुण्यात पोहोचण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. बैठकीतून बाहेर पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, नेतृत्वाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, उदय सामंत येण्यापूर्वीच नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये AB फॉर्म वाटपाला सुरुवात केली. मात्र, फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली. हॉटेलमधील गोऱ्हे यांच्या खोलीबाहेरच वादावादीला तोंड फुटले. “माझं नाव आधी”, “आम्हाला डावललं जातंय” अशा आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चिघळले.










