मामाने दिली भाच्याच्या हत्येसाठी 2 लाख रुपयांची सुपारी! कारण त्याच्याच गर्लफ्रेंडसोबत... नेमकं प्रकरण काय?
एका तरुणाची निर्घृण हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आल्याचं वृत्त आहे. तपासादरम्यान, अभिषेक आणि त्याचा मामा संतोष यांचे एकाच तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मामाने दिली भाच्याच्या हत्येसाठी 2 लाख रुपयांची सुपारी!
कारण त्याच्याच गर्लफ्रेंडसोबत... नेमकं प्रकरण काय?
Crime News: बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून अनैतिक संबंधाचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातील नाथनगर येथील रहिवासी असलेल्या अभिषेक नावाच्या तरुणासोबत ही भयानक घटना घडली. तपासादरम्यान, अभिषेक आणि त्याचा मामा संतोष यांचे एकाच तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. इतकेच नव्हे तर, पीडित अभिषेक नेहमी त्याच्या मामाला त्याच्या संबंधाबद्दल मामीला सांगण्याची धमकी द्यायचा आणि त्याला ब्लॅकमेल करायचा. यामुळे, संतापलेल्या आरोपी संतोषने मारेकऱ्यांना 2 लाख रुपयांची सुपारी देऊन अभिषेकची हत्या केली.
ब्राउन शुगरच्या नशेत तरुणाची हत्या...
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भात मृताचा मामा संतोष याला अटक करण्यात आली असून इतर चार आरोपींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच, घटनेतील तीन हल्लेखोरांनी ब्राउन शुगरच्या नशेत असताना हे भयंकर कृत्य केल्याचे पुरावे पोलिसांना आढळले आहेत. इतकेच नव्हे तर, अनैतिक संबंधाव्यतिरिक्त आणखी एका कारणावरून पीडित तरुणाचे त्याच्या मामासोबत सतत वाद व्हायचे.
हे ही वाचा: अखेर किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर, हातातील एबी फॉर्म दाखवत मातोश्रीबाहेर येऊन दिली पहिली प्रतिक्रिया
सायबर फसवणूकीच्या कामावरून वाद
खरं तर, संतोष आणि त्याच्या इतर साथीदारांचा सायबर फसवणूकीच्या गुन्ह्यात सहभाग होता. याच, सायबर फसवणूकीच्या पैशांवरून आरोपी आणि त्याच्या पीडित भाच्यामध्ये वाद व्हायचे. पीडित अभिषेक त्याच्या मामाच्या या फसवणूकीच्या कामात अकाउंटंट म्हणून काम करत होता आणि त्याच्या व्यवसायावर तसेच आर्थिक कामकाजावर अभिषेक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आरोपीला वाटत होतं. यामुळे, संतोषचा त्याच्या भाच्यावर प्रचंड राग होता.
हे ही वाचा: BMC Election: रात्री प्रचंड मोठ्या घडामोडी, शेवटच्या क्षणी शिवसेना-भाजपने केली 'ती' घोषणा!
अभिषेकच्या हत्येसाठी 2 लाख रुपयांची सुपारी
घटनेच्या दिवशी, अभिषेकने राधे आणि रितिक नावाच्या आरोपींच्या अकाउंटमध्ये फोनवरून पैसे ट्रान्सफर केल्याचं तपासात दिसून आलं. रितिक, राधे आणि आयुष या मारेकऱ्यांनी अभिषेकच्या हत्येसाठी संतोषकडून 2 लाख रुपयांची सुपारी घेतल्याचं मारेकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. यासाठी, आरोपी मामाने भाच्याच्या हत्येसाठी 10,000 रुपये अॅडव्हान्स दिले होते. रविवारी दुपारच्या सुमारास संबंधित घटना उघडकीस आली असून पोलिसांना पीडित अभिषेकचं छाटलेलं मुंडकं आणि पाय सापडल्यानंतर त्यांनी तातडीने त्याच्या कुटुंबियांना याची माहिती दिली.










