बीड हादरलं! 'मी घटस्फोट देऊन तुझ्याशी...' पोलीस अधिकाऱ्याचे महिलेला लग्नाचे आमिष, नंतर लॉजवर नेत केला अत्याचार
Beed crime : बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'माझं पत्नीशी पटत नाही, मी घटस्फोट देऊन तुझ्याशी विवाह करेन...'
बीडमध्ये माणुसकीला काळीमा
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
Beed Crime : बीडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर अत्याचार केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता पीडितेनं पोलीस ठाणे गाठून पोलिसावर कारवाईची मागणी केली. घडलेल्या घटनेनुसार, पीडित महिला ही 2022 पासून पतीपासून विभक्त राहत होती. कैटुंबिक वादात आणि कायदेशीररित्या कचाट्यात सापडलेल्या महिलेचा पोलिसाने गैरफायदा घेतला.
हे ही वाचा : पुण्यात तरुणाचं अपहण केलं, नंतर निर्जनस्थळी नेत लोखंडी रॉडसह दगडाने केला भीषण हल्ला, तरुणाचा जागीच अंत
'माझं पत्नीशी पटत नाही, मी घटस्फोट देऊन तुझ्याशी विवाह करेन...'
'मी पोलीस असून तुला कोर्टाच्या कामात न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवले', असा विश्वास पीडितेला दिला होता. 'माझ्या पत्नीशी माझं पटत नाही, तिला घटस्फोट देऊन मी तुझ्याशी विवाह करेन', असे खोटे आश्वासन देऊन त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या प्रकरणाला भयंकर वळण प्राप्त झालं. आरोपीने महिलेला माजलगाव येथील एका लॉजवर नेण्यात आले होते. तिथे विवाहाचे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
या प्रकरणात पीडितेनं आरोप केला की, उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते, ज्यात तिला गंभीर शारीरिक इजा देखील झाली होती. पीडितेला रुग्णालयात दाखल करून तिला तीन टाके पाडण्यात आल्याचे वृत्त आहे. या उपचाराचा खर्च हा ऑनलाइन स्वरुपात भरण्यात आला होता, आता या गुन्ह्यात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा मानला जात आहे.
पीडितेचा लग्नासाठी तगादा
पीडितेनं या सर्व प्रकरणानंतर लग्नासाठी तागादा लावला, तेव्हा आरोपीने तिला धमकावण्यास सुरुवात केली. मी पोलीस आहे. वरिष्ठ अधिकारी हे माझ्या ओळखीचे आहेत, ते माझे काहीही करू शकत नाहीस, असं म्हणत त्याने तिला तुच्छ वागणूक दिली. पीडितेचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यासोबत तिला नंतर जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली होती.










