अकोल्यात शिक्षिका ड्रायव्हरच्या प्रेमात झाली वेडी, कुटुंबाने लग्नाला केला विरोध, नंतर रेल्वेखाली उडी मारत...

मुंबई तक

Akola News : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्याला कुटुंबाने कडाडून विरोध केला. याच त्रासाला कंटाळून जोडप्यांनी एकत्रच जीवन संपवलं.

ADVERTISEMENT

Akola news
Akola news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अकोला जिल्ह्यात धक्कादायक घटना

point

दोघांच्या प्रेमाला कुटुंबाकडून विरोध 

Akola News : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्याला कुटुंबाने कडाडून विरोध केला. याच त्रासाला कंटाळून जोडप्यांनी एकत्रच जीवन संपवलं. ही घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या शेळद गावात घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी 31 डिसेंबर रोजी कसुरा गावानजीक असलेल्या रेल्वेमार्गावरक या दोघांचाही मृतदेह आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : बीड हादरलं! 'मी घटस्फोट देऊन तुझ्याशी...' पोलीस अधिकाऱ्याचे महिलेला लग्नाचे आमिष, नंतर लॉजवर नेत केला अत्याचार

नेमकं काय घडलं? 

या प्रकरणातील प्रियकराचं नाव अक्षय सुरेश थारकर (वय 32) आणि अक्षदा मोहन शेजोळे (वय 24) अशी मृतांची नावे आहेत. अक्षय हा पोटापाण्यासाठी वाहनचालक म्हणून कार्यरत होता, तर अक्षदा एका कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. काही वर्षांपासून त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते, त्यांना विवाह करून संसार करायचा होता. पण सर्व स्वप्न धुळीत मिळालं.

दोघांच्या प्रेमाला कुटुंबाकडून विरोध 

दोघांच्या नात्याला कुटुंबियांनी विरोध केला होता. कुटुंबाने केलेल्या या विरोधामुळे दोघेही मानसिक तणावाखाली गेले होते. या विरोधाला कंटाळून त्यांनी रेल्वेखाली धाव घेत आपलं जीवन संपवल्याचं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी उरळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

हे ही वाचा : पुण्यात तरुणाचं अपहरण केलं, नंतर निर्जनस्थळी नेत लोखंडी रॉडसह दगडाने केला भीषण हल्ला, तरुणाचा जागीच अंत

परिस्थिती बघून उरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. या दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. या घटनेनं शेळद गावावर शोककळा पसरली आहे. अशातच पोलिसांनी दोघांचा अकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp