विवाहित महिलेला लग्नाची मागणी पण नकार मिळताच थेट गोळी झाडली अन्... आरोपीचं भयंकर कृत्य!
प्रेमाच्या नावाखाली तरुणाने पीडितेसोबत भयंकर कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित महिलेने आरोपीसोबत लग्न करण्यासाठी नकार दिला असता तिच्यावर गोळी झाडण्यात आल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विवाहित महिलेला लग्नाची मागणी पण...
लग्नासाठी नकार मिळताच थेट गोळी झाडली अन्...
आरोपी तरुणाचं भयंकर कृत्य
Crime News: प्रेमाच्या नावाखाली तरुणाने पीडितेसोबत भयंकर कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. महिलेने आरोपीसोबत लग्न करण्यासाठी नकार दिला असता तिच्यावर गोळी झाडण्यात आल्याचं वृत्त आहे. संबंधित घटना ही बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात घडली असल्याची माहिती आहे. घटनेच्या आरोपीने महिलेला धमकी देत म्हटलं की, "लग्न केलं नाहीस तर हेच परिणाम भोगावे लागतील." या खळबळजनक घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास 9 वाजताच्या सुमारास आरोपीने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. तरुणाने तिच्यावर गोळी झाडल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. त्यानंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीला तातडीने स्थानिक लोकांच्या मदतीने भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचारांनंतर, तिची गंभीर प्रकृती पाहता तिला पाटणा येथे रेफर करण्यात आलं.
विवाहित महिलेला लग्नाची मागणी अन् नकार मिळताच..
संबंधित पीडिता ही भवानीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात महिलेने पोलिसांना सांगितलं की, 2017 मध्ये तिचं भवानीपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणासोबत लग्न झालं असून तिला दोन मुलं सुद्धा आहेत. तरीसुद्धा, आरोपी तरुण बऱ्याच काळापासून त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी पीडितेवर दबाव आणत होता. पीडिता सतत तिला नकार देत असल्याने तो प्रचंड संतापला आणि त्याने तिला जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: रेल्वे प्रशासनाचं मोठं पाऊल! आता, फुकट्या प्रवाशांची खैर नाही...
पीडितेवर गोळी झाडली अन्..
पीडितेच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ती गावातून जात असताना आरोपीने अचानक तिची वाट अडवली. त्यावेळी, दोघांमध्ये मोठा वाद झाला. दरम्यान, आरोपीने त्याच्या कंबरेला असलेली पिस्तूल काढली आणि पीडितेवर गोळी झाडली. घटनेच्या वेळी, आरोपी तरुणाने तिला धमकी देत म्हटलं की, "लग्न करण्यासाठी नकार दिल्यावर हेच परिणाम होतील."










