शेजारच्या महिलेसोबत पतीचं अफेअर... पत्नीला कल्पना सुद्धा नव्हती अन् अचानक पतीचं टोकाचं पाऊल!
तरुणाचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, अचानक पीडित तरुण डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचं ठरवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आधी एक व्हिडीओ सुद्धा बनवला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेजारच्या महिलेसोबत पतीचं अफेअर...
अचानक पतीचं टोकाचं पाऊल!
नेमकं प्रकरण काय?
Crime News: राजस्थानच्या कोटा येथे 4 मुलांच्या पित्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणातील मृत तरुणाचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, त्याची प्रेयसी त्याला ब्लॅकमेल करून सतत पैशांची मागणी करत होती. याच कारणामुळे पीडित तरुण डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचं ठरवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आधी एक व्हिडीओ सुद्धा बनवला, ज्यामध्ये तो त्या शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत बोलताना दिसत आहे.
शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध...
संबंधित प्रकरण हे गुमानपूरा पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण मागील 10 वर्षांपासून त्याच्या पत्नी आणि चार मुलांसह राहत होता. दरम्यान, त्याचे शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू झाले. या तरुणाचं नाव बीरमचंद असून त्याचं 10 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज झालं होतं. लग्नानंतर, त्याला चार मुलं सुद्धा झाली. मृताच्या मेहुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा दाजी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता.
हे ही वाचा: आईशी वाद झाल्याने रात्री उशीरा घराबाहेर पडली, पण लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार...
सतत पैशांची मागणी करत ब्लॅकमेल
कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, ज्या महिलेसोबत तरुणाचे प्रेमसंबंध होते, ती त्याला सतत पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ सुद्धा बनवला होता. त्यामध्ये, तो त्याच्या प्रेयसीसोबत बोलताना दिसत आहे. नातेवाईकांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, शेजारची महिला ही तरुणाकडे सतत पैशांची मागणी आणि दबाव आणत असल्याचं व्हिडीओमधून समोर येत आहे. याव्यतिरिक्त, मृताच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे असलेले असे आणखी काही ऑडिओ आणि व्हिडीओ पोलिसांकडे सोपवले आहेत.
हे ही वाचा: नवी मुंबई: सोशल मीडियावर ओळख, प्रेमाचं नाटक अन् 10 वीच्या विद्यार्थ्याला जाळ्यात ओढलं; भेटण्यासाठी बोलवून...
तसेच, मृताच्या पत्नीने याबद्दल सांगितलं की, तिला तिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत काहीच माहिती नव्हती. ती म्हणाली की, "आमच्या कुटुंबात असे कोणतेच वाद नव्हते कारण, माझे पती काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते." आता, मृताच्या कुटुंबियांनी या प्रकरणासंदर्भात निष्पक्ष चौकशीची मागणी केली. कुटुंबातील सदस्यांचे देखील जबाब नोंदवण्यात आले असून उपलब्ध ऑडिओ तसेच व्हिडिओ पुरावे तपासले जात आहेत. चौकशीनंतरच, आरोपीवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.










