आईशी वाद झाल्याने रात्री उशीरा घराबाहेर पडली, पण लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार...

मुंबई तक

रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडिता रात्री उशीरा आपल्या घरातून बाहेर पडली होती.

ADVERTISEMENT

कारमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार...
कारमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आईशी वाद झाल्याने रात्री उशीरा घराबाहेर पडली

point

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार...

Crime News: रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडिता रात्री उशीरा आपल्या घरातून बाहेर पडली होती. दरम्यान, कारमधील दोन तरुणांनी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवलं आणि फरीदाबाद-गुरुग्राम रोडवर चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर, नराधमांनी तिला रस्त्याच्या कडेला फेकलं आणि तिथून फरार झाले. त्यावेळी, तरुणीच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून याचा तपास सुरू केला आहे. 

आईशी वाद झाल्याने घराबाहेर पडली... 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता रात्री उशीरा आपल्या घरातून बाहेर पडली होती. तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या मैत्रीणीच्या घरी जाते असं सांगून घराबाहेर निघाली होती. तरुणीच्या बहिणीने तक्रार करताना सांगितलं की, रात्री 8:30 वाजताच्या सुमारास, तिला पीडितेचा फोन आला, त्यावेळी, तिचा घरी तिच्या आईशी वाद झाला असून ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असल्याचं पीडित तरुणीने तिला सांगितलं. तसेच, ती 3 तासांत घरी परतणार असल्याचं देखील म्हणाली होती. 

हे ही वाचा: नवी मुंबई: सोशल मीडियावर ओळख, प्रेमाचं नाटक अन् 10 वीच्या विद्यार्थ्याला जाळ्यात ओढलं; भेटण्यासाठी बोलवून...

चालत्या कारमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार 

पीडितेच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास 12:00 वाजताच्या सुमारास ती वाटेत ऑटोची वाट पाहत थांबली होती. दरम्यान, तिच्यासमोर एक कार येऊन थांबली आणि त्यामध्ये दोन तरुण बसलेले होते. त्यानंतर, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन्ही नराधमांनी गाडी गुरुग्राम रोडच्या दिशेने नेली. आरोपानुसार, एक तरुण कार चालवत होता तर दुसऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने आरोपींना विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, त्यावेळी तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर, रात्री 3:00 वाजताच्या सुमारास आरोपींनी तिला चालत्या गाडीतून फेकून दिलं आणि तिथून फरार झाले. यात, पीडिता गंभीररित्या जखमी झाली. 

हे ही वाचा: यवतमाळ: लेकरू झाल्याचा आनंद क्षणार्धात दु:खात बदलला; बाळाला भेटण्यासाठी जाताना वाटेतच वडिलांचा अपघाती मृत्यू...

घटनेनंतर, रात्री उशीरा जखमी झालेल्या पीडितेने आपल्या बहिणीला फोन करून तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. त्यानंतर, तिची बहीण घटनास्थळी पोहोचली. उपचारांसाठी, पीडितेला फरीदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तरुणीची प्रकृती पाहता डॉक्टरांनी तिला दिल्लीच्या एम्ससाठी रेफर केलं. सध्या, फरीदाबादच्या एका प्रायव्हेट रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp