लग्नाचं आश्वासन देऊन तरुणीसोबत नको ते केलं! नंतर, फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्याची धमकी, अखेर पीडितेने वैतागून...
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचं शारीरिक शोषण केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. आरोपीने AI च्या मदतीने तरुणीचे अश्लील फोटो बनवले आणि त्या फोटोंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नाचं आश्वासन देऊन तरुणीसोबत नको ते केलं!
नंतर, फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्याची धमकी
Crime News: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचं शारीरिक शोषण केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. आरोपीने AI च्या मदतीने तरुणीचे अश्लील फोटो बनवले आणि त्या फोटोंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. शेवटी, ब्लॅकमेलिंगला वैतागून पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या प्रकरणासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी...
संबंधित प्रकरण मझोला पोलीस स्टेशन हद्दीतील असून येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय तरुणीने कटघर परिसरात राहणाऱ्या जुबेर नावाच्या तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. 30 डिसेंबर रोजी पीडितेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. पीडितेच्या आरोपानुसार, आरोपी तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अककवलं आणि नंतर, लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर, पीडितेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणल्यानंतर त्याने AI च्या मदतीने तरुणीचे अश्लील फोटो तयार केले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा: Govt Job: ITI पास ते MBA उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, कोणत्याही परीक्षेशिवाय होणार भरती...
या सगळ्याला वैगातून अखेर पीडितेने विषारी पदार्थाचं सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पीडिता बेशुद्ध पडल्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं आणि उपचारांमुळे तिचा जीव वाचला. त्यानंतर, पीडितेने सांगितलं की, आरोपीने तिचं लैंगिक शोषण केलं आणि तिचे AI च्या मदतीने अश्लील फोटो तयार करून तिला धमकी दिली. यानंतर, कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास सुरू केला.
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी तरुणाविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, आरोपीला लवकरच अटक केली जाणार असून त्याची रवानगी केली जाणार आहे.










