Govt Job: ITI पास ते MBA उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, कोणत्याही परीक्षेशिवाय होणार भरती...

मुंबई तक

इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज (ITI) कडून तरुणांसाठी प्रोफेशनल्स ग्रॅज्युएट्स, टेक्निशिअन आणि ऑपरेटर्स पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

'या' सरकारी कंपनीत निघाली भरती...
'या' सरकारी कंपनीत निघाली भरती...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ITI पास ते MBA उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

point

'या' सरकारी कंपनीत कोणत्याही परीक्षेशिवाय होणार भरती...

Govt Job: इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज (ITI) मध्ये उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कंपनीकडून तरुणांसाठी प्रोफेशनल्स ग्रॅज्युएट्स, टेक्निशिअन आणि ऑपरेटर्स पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 12 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 

एकूण 215 रिक्त पदांसाठी भरती... 

ITI लिमिटेड ही विविध इंडस्ट्री सेगमेंटमध्ये बऱ्याच प्रकारच्या प्रोडक्ट, सॉल्यूशन्स आणि सर्व्हिस प्रदान करते. ही कंपनी आता बंगळूरु, नैनी, रायबरेली, मनकापुर, पलक्कड़ आणि श्रीनगर येथे उत्पादन युनिट्स चालवते आणि 4G उपकरणे, संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर दूरसंचार उत्पादने बनवते. 'आयटीआय लिमिटेड'मध्ये यंग प्रोफेशनल्स पदांसाठी भरती केली जाणार असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार itiltd.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत, एकूण 215 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी पदांनुसार, ग्रॅज्युएशन, B.Tech/ BE, ITI, MBA/ PGDM आणि PG डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यंग टेक्नीशियन/ जनरलिस्ट पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांसाठी 35 वर्षे उच्च वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, संघटनेच्या अंतर्गत उमेदवारांसाठी, ही मर्यादा 45 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेच्या माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन तपासू शकतात. 

हे ही वाचा: नांदेड हळहळलं! "आई, बाबा तुमची आठवण..." इंस्टावर भावनिक पोस्ट आणि 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या

या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी आणि वेगवेगळ्या ब्रांचमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये लेह-लडाख, जम्मू आणि काश्मीर, जालंधर, बीकानेर, जोधपूर, बरेली, कोलकाता, तेजपूर, भरतपूर/ दिल्ली, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर राज्ये, बेंगळुरू, पलक्कड, मानकापूर, रायबरेली, नैनी, दिल्ली, लखनौ, चेन्नई, मुंबई, गुवाहाटी आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp