आई पोलीस दलात सक्रिय, लेकीवर सावत्र बापाने बंद दाराआड केला अत्याचार, लाज आणणारी घटना
crime news : एका महिलेच्या 13 वर्षीय चिमुकल्या मुलीवर तिच्याच सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनं बाप आणि मुलीच्या नात्यात लाज आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सातवीत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर बंद दाराआड...
आईच्या पायाखालची जमीन सरकली
Crime News : उत्तर प्रदेशातील माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं 13 वर्षीय चिमुकल्या मुलीवर तिच्याच सावत्र बापाने लैंगिक अत्याचा केला. या घटनेनं बाप आणि मुलीच्या नात्याला काळं फासलं आहे. पीडितेची आई ही पोलीस दलात कार्यरत असून तिच्याच मुलीवर अत्याचार होतो.
हे ही वाचा : काही राशीतील लोकांना खरं प्रेम मिळणार, तर काही नोकरदारांच्या पगारात भरभराट होणार
सातवीत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर बंद दाराआड...
या प्रकरणातील पीडित मुलगी ही इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती. नंतर ती देवरिया येथील पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आई आणि सावत्र वडिलांसोबत राहत होती. 25 डिसेंबर रोजी नराधम बापाने घराच्या बंद दाराआड आपल्या सावत्र मुलीवर अत्याचार केला होता. भयावह वातावरणात वावरणाऱ्या मुलीने हे भयंकर कृत्य आपल्या शाळेतील मुलीला सांगितलं होतं. मैत्रिणीने तातडीने ही बाब शाळेतील शिक्षिकेच्या कानावर घातली होती, यामुळे हे प्रकरण समोर आलं.
आईच्या पायाखालची जमीन सरकली
शाळेच्या शिक्षिकेला हे प्रकरण समजताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणाची माहिती पोलीस दलात सक्रिय असलेल्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. नंतर तिने पतीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा तक्रार दाखल केला. पोलिसांनी चक्र फिरवून काही तासांमध्ये नराधम बापाच्या बेड्या ठोकल्या आहेत, या प्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
हे ही वाचा : मतदानापूर्वीच दोन नगरसेविका निवडून आल्या, रवींद्र चव्हाणांचा आनंद गगनात मावेना! थेट देवेंद्र फडणवीसांना फोन
या घटनेनं पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. ज्या आईनं समाजातील लोकांना सुरक्षा दिली होती, तिच्याच घरात तिच्याच मुलीवर सावत्र बापाने अत्याचार केला. अशातच आता नराधम बापाला शिक्षा मिळावी अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.










