गवंड्यासोबत पैशांवरुन जुंपली, बांधकाम सुरु असतानाच पप्पूने डोक्यात घातला हातोडा; नेमकं काय घडलं?
Crime News : पैशांवरुन झालेल्या वादात एका गवंड्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बांधकाम चालू असलेल्या घरातच ही घटना घडली. गवंडी आणि मजूर यांच्यात पैशांवरुन जोरदार वाद झाला. या वादात मजूराने गवंड्याच्या डोक्यात हातोडा घातला. यामुळे गवंड्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मजूराने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न फसला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गवंड्यासोबत पैशांवरुन जुंपली
बांधकाम सुरु असतानाच पप्पूने डोक्यात घातला हातोडा
नेमकं काय घडलं?
Crime News : पैशांवरुन झालेल्या वादात एका गवंड्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बांधकाम चालू असलेल्या घरातच ही घटना घडली. गवंडी आणि मजूर यांच्यात पैशांवरुन जोरदार वाद झाला. या वादात मजूराने गवंड्याच्या डोक्यात हातोडा घातला. यामुळे गवंड्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मजूराने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न फसला. चोवीस तासांतच पोलिसांनी त्याला अटक केले. पप्पू असं आरोपीचं नाव असून उत्तराखंडच्या डेहराडून मधील ही घटना आहे.
हे ही वाचा : विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं... पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!
पैसे आणि वादातून कृत्य
शनिवारी (28 फेब्रुवारी) गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पप्पूला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पप्पूने सांगितले की, तो आणि बबलू एकत्र मजुरीचे काम करायचे. घटनेच्या रात्री दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या पप्पूने जवळच असलेला हातोडा उचलून बबलूच्या डोक्यात घातला. वार वर्मी लागल्याने बबलू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो काहीच हालचाल करत नाही हे पाहून घाबरलेल्या पप्पूने त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून तो पसार झाला. पोलीस आपल्याला पकडू शकणार नाहीत या अविर्भावात तो परिसरातच फिरत होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी काय सांगितले?
पोलीस उपअधीक्षक नीरज सेमवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी पोलिसांना धारकोट येथील नीम करोली मंदिराजवळ एका अर्धवट बांधलेल्या घरात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बबलू असे मृत गवंड्याचे नाव आहे.










