कराटे क्लासमधील 'करण' निघाला जावेद, प्रेमाच्या जाळ्यात अडकून अत्याचार, अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग 

मुंबई तक

MP Crime News : आरोपीच्या खोट्या ओळखीचा खुलासा एका कार्यक्रमादरम्यान झाला. कराटे क्लासमध्ये बेल्ट ग्रेडिंगचा कार्यक्रम सुरू असताना, जेव्हा 'जावेद' असे नाव पुकारण्यात आले, तेव्हा करण सिंह म्हणून ओळख सांगणारा तरुण प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे गेला. यामुळे पीडितेला संशय आला. तिने विचारणा केली असता, आरोपीने त्याचे खरे नाव जावेद अख्तर असल्याचे कबूल केले. सत्य समोर आल्यानंतर तरुणीने विरोध केला असता, त्याने तिला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली.

ADVERTISEMENT

MP Crime News
MP Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कराटे क्लासमधील 'करण' निघाला जावेद

point

प्रेमाच्या जाळ्यात अडकून अत्याचार, अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग 

MP Crime News , इंदूर (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 'लव्ह जिहाद'चा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका कराटे ट्रेनरने स्वतःची खोटी ओळख सांगून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी उशिरा रात्री आरोपीला अटक केली आहे.

'करण सिंह' असल्याचं सांगून केली मैत्री

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी महू परिसरातील रहिवासी आहे. 2020 मध्ये डॉ. आंबेडकर विद्यापीठात शिक्षण घेत असताना ती महू येथील एका कराटे क्लासमध्ये जात होती. तिथे एका तरुणाने आपले नाव 'करण सिंह' असल्याचे सांगून तिच्याशी मैत्री केली. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 14 जानेवारी 2024 रोजी घरात कोणीही नसताना आरोपीने तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने तिचे शोषण केले.

हेही वाचा : पुणे : पिंपरी-चिंचवडमधील 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्याचा फटका

असा झाला नावाचा पर्दाफाश

आरोपीच्या खोट्या ओळखीचा खुलासा एका कार्यक्रमादरम्यान झाला. कराटे क्लासमध्ये बेल्ट ग्रेडिंगचा कार्यक्रम सुरू असताना, जेव्हा 'जावेद' असे नाव पुकारण्यात आले, तेव्हा करण सिंह म्हणून ओळख सांगणारा तरुण प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे गेला. यामुळे पीडितेला संशय आला. तिने विचारणा केली असता, आरोपीने त्याचे खरे नाव जावेद अख्तर असल्याचे कबूल केले. सत्य समोर आल्यानंतर तरुणीने विरोध केला असता, त्याने तिला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp