मतदानापूर्वीच दोन नगरसेविका निवडून आल्या, रवींद्र चव्हाणांचा आनंद गगनात मावेना! थेट देवेंद्र फडणवीसांना फोन
Ravindra Chavan phone call to Devendra Fadnavis : दोन जागांवर थेट विजय मिळाल्याची माहिती मिळताच रवींद्र चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून ही बातमी दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविकांचे अभिनंदन केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मतदानापूर्वीच दोन नगरसेविका निवडून आल्या
रवींद्र चव्हाणांचा आनंद गगनात मावेना!
थेट देवेंद्र फडणवीसांना फोन
Ravindra Chavan phone call to Devendra Fadnavis : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतून भाजपसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वत्र इच्छुकांची गर्दी, नाराजी, बंडखोरी आणि पक्षांतराची चित्रं पाहायला मिळत असताना, भाजपने मात्र थेट विजयाचे खाते उघडले आहे. विशेष म्हणजे, मतदान होण्याआधीच दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भाजपच्या दोन नगरसेविका बिनविरोध निवडून आल्या
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 ‘अ’ मधून भाजपच्या उमेदवार रेखा राजन चौधरी यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. हा प्रभाग ओबीसी महिला आरक्षणासाठी राखीव असून, या जागेसाठी केवळ रेखा चौधरी यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांचा बिनविरोध विजय स्पष्ट मानला जात आहे. उद्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून, त्यानंतर अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. मात्र, राजकीय वर्तुळात या विजयाची चर्चा आधीपासूनच रंगू लागली आहे.
याचबरोबर भाजपला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 26-क मधून भाजपच्या आसावरी केदार नवरे या उमेदवारही बिनविरोध निवडून आल्या आहेत. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराने मैदानात उतरण्याची हिंमत न दाखवल्याने या दोन्ही जागांवर भाजपचा विजय मतदानापूर्वीच शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे.
या घडामोडींमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. दोन जागांवर थेट विजय मिळाल्याची माहिती मिळताच चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून ही बातमी दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविकांचे अभिनंदन केले. भाजप नेतृत्वाच्या रणनीतीला मिळालेले हे यश मानले जात असून, कल्याण-डोंबिवलीतील संघटनात्मक ताकदीचे हे प्रतीक असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.










