बीड आहे की नरक? आई-वडील ऊसतोडीसाठी जाताच किराणा दुकानदारातील राक्षस जागा, 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Beed Crime News : 24 डिसेंबर रोजी दुपारी साधारण बारा वाजण्याच्या सुमारास मुलींचे वडील व नातेवाईक शेतात ऊसतोडणीसाठी गेले होते. त्या वेळी दोन अल्पवयीन मुली झोपडीत एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत गावातीलच किराणा दुकानदार गणेश राजेभाऊ घाटूळ आणि त्याचा मित्र, ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार यांनी तिथे येत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड आहे की नरक?
आई-वडील ऊसतोडीसाठी जाताच किराणा दुकानदारातील राक्षस जागा
2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Beed Crime News, बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा माणुसकी हादरवणारी आणि समाजाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीसाठी परराज्यातून आलेल्या मजुराच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विश्वासाचा मुखवटा घालून वावरणारे गावातीलच लोक किती क्रूर असू शकतात, याचा हा भयावह प्रत्यय आहे. त्यामुळे बीड आहे का नरक? असा सवालही उपस्थित केला जातोय.
किराण दुकानदाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातून 14 कुटुंबे माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीच्या कामासाठी वास्तव्यास आली होती. ही कुटुंबे तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहत होती. 24 डिसेंबर रोजी दुपारी साधारण बारा वाजण्याच्या सुमारास मुलींचे वडील व नातेवाईक शेतात ऊसतोडणीसाठी गेले होते. त्या वेळी दोन अल्पवयीन मुली झोपडीत एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत गावातीलच किराणा दुकानदार गणेश राजेभाऊ घाटूळ आणि त्याचा मित्र, ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार यांनी तिथे येत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : BMC Election: भाजपची 137 जणांची यादी आली समोर, तुमच्या वॉर्डात कोण आहे भाजपचा उमेदवार?
दोघांनीही मुलींना जबरदस्तीने झोपडीतून ओढत बाहेर नेले. गणेश घाटूळ याने एका मुलीला उसाच्या शेतात नेले, तर अशोक पवार याने दुसऱ्या मुलीला कपाशीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर “ही गोष्ट कुणाला सांगितली तर ठार मारू,” अशी दहशत निर्माण करणारी धमकी देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या आणि मानसिक धक्क्यात असलेल्या मुलींनी काही दिवस हा प्रकार कुणालाही सांगितला नाही.










