BMC Election: भाजपची 137 जणांची यादी आली समोर, तुमच्या वॉर्डात कोण आहे भाजपचा उमेदवार?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने 137 जणांना उमेदवारी दिली आहे. ज्याची नेमकी यादी आता समोर आली आहे. पाहा तुमच्या वॉर्डात भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या 137 उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. महायुती आघाडीतील जागावाटपानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 90 जागा मिळाल्या असून, भाजपने उर्वरित 137 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने थेट उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले होते. मात्र, आता भाजपने नेमकं कोणाकोणाला उमेदवारी दिली आहे हे समोर आलं असून नेमकी यादीच जाहीर झाली आहे. या यादीत जुने अनुभवी चेहरे तसेच नव्या दमाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला नुकताच अंतिम झाला. भाजपने मुंबईतील आपल्या बालेकिल्ल्यात मजबूत उमेदवार उतरवले असून, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पारंपरिक जागांवरही दमदार आव्हान दिले आहे. महायुतीने 150 पेक्षा अधिक जागा जिंकून मुंबईत आपलाच महापौर बसवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने UBT ने मनसेसोबत युती केली असून, ते सुमारे 160-165 जागांवर लढणार आहेत.
यादीची वैशिष्ट्ये आणि रणनीती
भाजपची ही यादी विविध आरक्षण गटांनुसार तयार करण्यात आली आहे. यात सामान्य, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि महिला आरक्षणाचा समावेश आहे. पक्षाने मुंबईच्या विविध भागांतील स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देत उमेदवार निवडले आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण मुंबई, उपनगर आणि पूर्व उपनगरातील जागांवर स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
हे ही वाचा>> BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण यादी आली समोर, पाहा तुमच्या वॉर्डात कोण आहे उमेदवार
भाजपने ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करण्यासाठी रणनीती आखली आहे. उदाहरणार्थ, दादर, वरळी, घाटकोपर, अंधेरी सारख्या भागांत मजबूत उमेदवार उतरवले आहेत. पक्षाच्या सूत्रांनुसार, या निवडणुकीत विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था हे प्रमुख मुद्दे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या योजना मुंबईत राबवण्याचा प्रचार भाजप करेल. मुंबईतील गुजराती, उत्तर भारतीय आणि मराठी मतदारांना एकत्रित करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल.










