मुंबईतील निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची 8 कोटींची फसवणूक झाल्याने आत्महत्या, भाजप पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

मुंबई तक

Crime News : फसवणुकीमुळे मानसिक तणावात सापडलेल्या अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली असून, या प्रकरणात पंजाब पोलिसांनी भाईंदरमधून भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Crime News
Mumbai Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची 8 कोटींची फसवणूक झाल्याने आत्महत्या

point

भाजप पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

 Mumbai Crime News : मुंबईच्या मीरा रोड येथील निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची तब्बल 8 कोटी 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीमुळे मानसिक तणावात सापडलेल्या अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली असून, या प्रकरणात पंजाब पोलिसांनी भाईंदरमधून भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना शुक्रवारी मीरा रोड न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्यांना पंजाबला नेण्यात आले आहे.

तपासानंतर शेरा ठाकूर ऊर्फ रणजीत नंबरदार सिंग (वय 30), प्रतीक बाफना (31) आणि आशिष कुमार संतोषकुमार पांडे (30) या तिघांना अटक करण्यात आली. शेरा ठाकूर हा भाजप युवा मोर्चाचा नवघर मंडळ अध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पंजाब पोलीस करत असून, फसवणुकीचे आणखी धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवृत्त आयपीएस अधिकारी अमर सिंह चहल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या घरी सापडलेल्या 12 पानांच्या सुसाइड नोटमुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या सुसाइड नोटमध्ये चहल यांनी आपली आर्थिक फसवणूक कशी झाली, याचा सविस्तर उल्लेख केला आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी एफ 777 डीबीएस वेल्थ इक्विटी रिसर्च ग्रुप या नावाने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर बनावट गुंतवणूक गट तयार करून डीबीएस बँकेच्या नावाचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे.

या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर सुरुवातीला चहल यांना मोठा नफा होत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात गुंतवलेली रक्कम किंवा नफा काढण्याचा प्रयत्न केला असता अडथळे निर्माण होत होते. पैसे काढण्यासाठी आणखी रक्कम भरावी लागेल, असे सांगून आरोपींनी वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे उकळले. अशा प्रकारे हळूहळू तब्बल 8 कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp