नवी मुंबई: पत्नी आणि तिच्या मामाकडून अश्लील व्हिडीओ पाठवून छळ, सतत चॅटिंग अन्... अखेर, तरुणाचं टोकाचं पाऊल

मुंबई तक

पत्नी आणि तिच्या मामाकडून सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ पाठवून सतत छळ केला जात असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

वैतागलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल...
वैतागलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नी आणि तिच्या मामाकडून अश्लील व्हिडीओ पाठवून छळ

point

पत्नीचं मामासोबत सतत चॅटिंग अन्...

point

अखेर, पतीने उचचलं टोकाचं पाऊल

Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील रबाळे भागात एका 27 वर्षीय तरुणाने मानसिक त्रास सहन न झाल्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि तिच्या मामाकडून सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ पाठवून सतत छळ केला जात असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात मृताची पत्नी वैष्णवी तुपसौंदर (25) आणि तिचा मामा संतोष ढगे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

मृत तरुणाचं नाव विनोद तुपसौंदर (27) असून रबाळे येथील साई नगर परिसरातील रहिवासी होता. जून महिन्यात त्यांचा नाशिकच्या वैष्णवी नाटकर या तरुणीशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही काळ दोघे सुखाने संसार करत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबई-पुणे प्रवास सुस्साट... बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक'चं काम लवकरच पूर्ण होणार!

पतीच्या इंस्टा अकाउंटवर पत्नीचे अश्लील व्हिडीओ... 

आरोपी वैष्णवी ही तिचा मामा संतोष ढगेशी मोबाइलवर सतत बोलत होती आणि नेहमी चॅटिंग करत होती. ही बाब विनोदला कळताच दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. एके दिवशी, वैष्णवी रागाच्या भरात माहेरी निघून गेली. त्याच दिवशी कोणीतरी विनोदच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वैष्णवीचे अश्लील व्हिडीओ पाठवले. हे व्हिडीओ संतोष ढगे यानेच पाठवल्याचा संशय मृताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. या घटनेमुळे विनोद पूर्णपणे खचून गेला आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालेल्या विनोदने अखेर 25 सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि मामाकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला आणि अपमानाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. 

हे ही वाचा: Govt Job: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी हवीये? PGIMER कडून बंपर भरती... 10 वी पास उमेदवारांना सुद्धा संधी

मृताच्या कुटुंबियांनी नोंदवली तक्रार 

मृताच्या कुटुंबीयांनी रबाळे पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वैष्णवी आणि संतोष ढगे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशा मानसिक छळाच्या घटना समाजात वाढत असल्याने, कौटुंबिक संबंध आणि सोशल मीडियाच्या वापरावर नियंत्रण आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp