नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चालणाऱ्या पक्षाबाबत तुम्ही बोलत आहात,भाजपचा अजित पवारांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवारांचं वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असणारं वक्तव्य आहे, असं मला वाटतं. अजित पवार यांनी सर्वप्रथम स्वत:च्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते कोणत्या पक्षाबद्दल बोलत आहेत? ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे"
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चालणाऱ्या पक्षाबाबत तुम्ही बोलत आहात
भाजपचा अजित पवारांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Chavan on Ajit Pawar, Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महायुतीची बंधने बाजूला ठेवत पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या 2026 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली. 2017 मध्ये मोदी लाट आणि विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचे आरोप यामुळे आमची सत्ता गेली, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या लोकांनी प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराचा कळस गाठला, असा आरोपही अजित पवारांनी केला. दरम्यान, या आरोपांना भाजप प्रदेशाध्यक्षांनी प्रत्युत्तर दिलंय.
"नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहात"
"अजित पवारांचं वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असणारं वक्तव्य आहे, असं मला वाटतं. अजित पवार यांनी सर्वप्रथम स्वत:च्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते कोणत्या पक्षाबद्दल बोलत आहेत? ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे", असा निर्वाणीचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना दिलाय.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीतील प्रत्येक वरीष्ठ नेत्याने ठरवलंय की, निवडणूक लढवताना मतभेद आणि मनभेद होणार नाही, याची काळजी तिन्ही पक्षांनी घ्यायची. अजित पवार असं का बोलले? हे मला माहिती नाही. अजित पवारांनी असं बोलायला नकोय. महायुतीत मतभेद होणार नाहीत, याची काळजी अजित पवार आणि आम्ही घ्यायची आहे.










