पुणे महापालिका : सर्वात श्रीमंत उमेदवार, 271.85 कोटींची संपत्ती; 1.75 किलो सोनं अन् आलिशान गाड्यांचं कलेक्शन

मुंबई तक

Pune Mahanagar Palika Election 2026 : प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पठारे यांची गुंतवणूक प्रामुख्याने रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. याशिवाय त्यांच्या मालकीच्या आलिशान वाहनांच्या यादीत मर्सिडिज बेंझ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

Pune Mahanagar Palika Election 2026
Pune Mahanagar Palika Election 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे महापालिका : निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

point

271.85 कोटींची संपत्ती; 1.75 किलो सोनं अन् आलिशान गाड्यांचं कलेक्शन

Pune Mahanagar Palika Election 2026 : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत उमेदवारांच्या संपत्तीचे तपशील समोर येत असून, यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेंद्र पठारे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सुरेंद्र पठारे यांच्या नावावर तब्बल 271.85 कोटी रुपयांची मालमत्ता असून, पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील ते सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या संपत्तीच्या आकड्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पठारे यांची गुंतवणूक प्रामुख्याने रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. याशिवाय त्यांच्या मालकीच्या आलिशान वाहनांच्या यादीत मर्सिडिज बेंझ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीतही ते मागे नाहीत. त्यांच्या नावावर सुमारे 1.75 किलो सोन्याचे दागिने असल्याचंही या प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे. त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत त्यांनी इतर सर्व उमेदवारांना मागे टाकलं आहे.

सायली वांजळे यांच्याकडे 77.65 कोटींची संपत्ती

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांचा क्रमांक लागतो. सायली वांजळे यांच्या नावावर एकूण 77.65 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची नोंद आहे. तुलनेने पाहता, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकातील उमेदवारांच्या संपत्तीत मोठी तफावत दिसून येते, जी मतदारांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.

बापूसाहेब पठारेंच्या कुटुंबातील 3 जण कमळावर लढणार

दरम्यान, या संपत्तीच्या चर्चेबरोबरच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींनाही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे पुण्यातील एकमेव आमदार बापूसाहेब पठारे ज्या ‘तुतारी’ चिन्हावर निवडून आले होते, तेच चिन्ह आता त्यांच्या मतदारसंघात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत दिसून येत नाही. आमदार बापूसाहेब पठारे स्वतः शरद पवार गटात असतानाही, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मात्र थेट भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp